'आई कुठे काय करते' मालिकेच्या कथानकाने आणि नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. सध्या ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनिरुद्ध आणि संजनामध्ये जोरदार खटके उडतायेत. अनिरुद्ध वारंवार तिला घटस्फोट देण्याची धमकी देतोय. पण संजनाही आपण हे घर सोडून कुठेही जाणार नाही असं अनिरुद्ध ठणकावून सांगताना दिसतेय. यावेळी मात्र अनिरुद्ध संजनावर गंभीर आरोप करताना दिसतोय.
नुकताच सोशल मीडियावर एक प्रोमो समोर आला आहे. यात अनिरुद्ध संजनाने अनघाला मुद्दामून धक्का देऊन पडल्याचा आरोप करतोय. तो तिच्यावर भयंकर चिडलेला दिसतोय.
प्रेग्नेंट असलेल्या अनघाला जिन्यावरून चढताना चुकून संजनाचा धक्का लागतो आणि ती भिंतीला जाऊन आपटते. संजना कुणाशी तरी फोनवर बोलताना घाई गडबडीत जिन्यावरून खाली येत असते. तर अनघा घरातील सामना घेऊन जिने चढत असते. तिला संजानाचा धक्का लागतो आणि तिचा तोल जाऊन भिंतीला आपटते. हे पाहून संजनाही घाबरते. दरम्यान अनिरुद्ध संजनाला आज तू विकृतपणाचा कळस गाठला आहेस, तो जाणूनबूजून अनघाला धक्का ढकलंस असा आरोप करतो. हे ऐकून संजनाही धक्का बसतो. आता यावरून घरात नवा काय वाद निर्माण होणार? संजनाने अनघाला मुद्दामून ढकलं का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला लवकरच मिळतील.