Join us

'रंग माझा वेगळा'मध्ये दीपिकाची आई समोर येताच उडाला कार्तिकच्या चेहऱ्याचा रंग, मालिकेत येणार नवा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 20:14 IST

आईला पाहून दीपिकाला खूप आनंद होतो. मात्र, त्या बाईला घरात बघून कार्तिकच्या चेहऱ्याचा रंग उडाला आहे.

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) मालिका गेल्या बऱ्याच दिवसांपासून टीआरपीच्या शर्यतीत अग्रेसर आहे. ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. या मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. कार्तिक आणि दीपा पुन्हा एकत्र येणार असून त्यांचे नाते बहरताना दिसत होतं.  सौंदर्यासोबतच आता दीपिका आणि कार्तिकीलादेखील दीपा आणि कार्तिकने एकत्र यावे असे वाटत आहे. त्यामुळे त्या तिघी खूप प्रयत्न करत आहे. पण आता घरी दिपिकाची खोटी आई येणार आहे, त्यामुळे मालिकेत एका नवा ट्विस्ट येणार आहे. 

सोशल मीडियावर नुकताच एक व्हि़डीओ समोर आला आहे. या व्हिडीओत एक अनोळखी बाई इनामदांच्या बंगल्यात येते आणि दिपिका तिला आई म्हणून हाक मारते. हे पाहून सौंदर्याला धक्का बसतो. कार्तिकही त्यावेळी घरी असतो. श्वेता दिपिकाला हिची तिची खरी आई असल्याचं सांगते. तर दिपिका म्हणते कार्तिकने तिला याच बाईचा फोटो दाखवत आई असल्याचं सांगितलं होतं.

दरम्यान मालिकेत दीपिका तात्पुरती शांत राहावी म्हणून त्याने एका भलत्याच बाईचा फोटो तिला दाखवला आहे. तुझी आई तुझ्या लहानपणीच देवाघरी गेली, असे कार्तिकने दीपिकाला सांगितले आहे.

इथे दीपिका तिची आई म्हणून कार्तिकने दिलेला फोटो सर्वांना दाखवत आहे. नेमकं त्याचवेळी श्वेता तिथे येऊन हा फोटो बघते आणि तिला या फोटोतील बाईबद्दल विचारते. श्वेताला बाईला रस्त्यावर बघते आणि तिला पैसे देऊन दीपिकाची आई असल्याचं नाटक करण्यास सांगते. कार्तिकने दीपिकाला आई म्हणून दिलेल्या फोटोतील बाई आता इनामदारांच्या घरात येणार आहे. त्यामुळे आता कार्तिकचं बिंग फुटणार का?, की दिपिकासमोर येणार सत्य हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  

टॅग्स :स्टार प्रवाह