Join us

'माझ्या नवऱ्याची बायको'मध्ये उडणार लग्नाचा बार, शनाया गुरुवनाथशी नाही तर पोपटरावशी करणार लग्न? 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2019 7:15 AM

या तिघांची अफलातून केमिस्ट्री हेच या मालिकेच्या यशाचं गमक आहे. दिवसेंदिवस रंगत जाणाऱ्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला आहे.

'गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं' असं म्हणत जवळपास २ वर्षांपूर्वी सुरु झालेली 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका रसिक प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय. आजवर टीआरपीचे नवे उच्चांक या मालिकेने प्रस्थापित केले आहेत.

आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करणारी, 'स्वावलंबी' राधिका, राधिकाच्या नवऱ्याला आपल्या तालावर नाचवणारी 'नखरेल' शनाया आणि राधिका-शनायाच्या कचाट्यात सापडलेला 'बिचारा' गुरुनाथ, या तिघांची अफलातून केमिस्ट्री हेच या मालिकेच्या यशाचं गमक आहे. दिवसेंदिवस रंगत जाणाऱ्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला आहे.

सध्या मालिका एका विलक्षण वळणावर आली आहे. एकीकडे गुरुनाथ एका गरीब वस्तीत राहून कसतरी दिवस ढकलतोय तर दुसरीकडे शनाया आणि तिची मम्मा पोपटरावकडे ऐषोआरामात राहत आहेत. सुलक्षणा बाईंनी सांगितल्याप्रमाणे पोपटराव शनायाशी लग्न करण्यासाठी १० कोटींची व्यवस्था करतो. इतकंच नव्हे तर सुलक्षणा आणि शनायावर पळत ठेवण्यासाठी पोपटराव दोन पंटर देखील ठेवतो. शनयाला पोपटसोबत लग्न करायचा नसल्यामुळे ती टेंन्शनमध्ये आहे. शनायाच लग्न पोपटसोबत न लावता १० कोटी घेऊन पसार कसं होता येईल याबद्दल सुलक्षणा विचार करतेय. ती शनायाला यासाठी गुरुची मदत घ्यायला सांगते. शनाया मम्माने सांगितल्याप्रमाणे गुरुची मदत घ्यायला जाते. पण गुरूच्या कठीण काळात शनायाने ओळख देखील दाखवली नव्हती त्यामुळे गुरु तिची मदत करणार का? दुसरीकडे पोपटरावने लग्नाची सर्व तयारी केली आहे. शनाया आणि पोपटच लग्न होणार का? सुलक्षणाचा पुढचा डाव काय असेल? हे सर्व प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

टॅग्स :माझ्या नवऱ्याची बायको