Join us

लग्नानंतर काहीच दिवसात मराठी अभिनेत्याचं बायकोसाठी पत्र, म्हणाला, "प्रचंड उन्हात मी...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 14:03 IST

लग्नाला जेमतेम ३ महिने झाले असताना मराठी अभिनेता ऋतुराज फडकेने बायकोला सविस्तर पत्र लिहिलं आहे.

'मन उडू उडू झालं' या लोकप्रिय मालिकेत इंद्राच्या भावाची भूमिका साकारणारा अभिनेता ऋतुराज फडके (Ruturaj Phadke) नुकताच लग्नबंधनात अडकला. २६ जानेवारी रोजी ऋतुराजचा साखरपुडा पार पडला आणि २७ जानेवारी रोजी तो लग्नबंधनात अडकला. ऋतुराजच्या पत्नीचं नाव प्रिती असं आहे. लग्नानंतर काहीच दिवसात ऋतुराजने बायकोसाठी खास पत्र लिहिलं आहे.

लग्नाला जेमतेम ३ महिने झाले असताना मराठी अभिनेता ऋतुराज फडकेने बायकोला सविस्तर पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्याने बायकोची जणू माफीच मागितली आहे. १७ तासांचं शूटिंग २ ते २.३० तास प्रवास यामुळे बायकोला वेळ देत येत नाही. कडकडीत उन्हातून शूट करुन आलेल्या नवऱ्याच्या पायाला बायको मलम लावून देते तेव्हा नवरा नि:शब्द होतो. म्हणूनच ऋतुराजने सगळं पत्रातून मांडलं आहे. तो लिहितो, 

पत्र लिहिण्यास कारण की..

प्रिय बायको..गेले अनेक दिवस मी दोन मालिकांचे शूटींग करत असल्यामुळे भेट होत नाही, शूटींगचा सेट माझ्या घरापासून २.३० तास अंतरावर असल्यामुळे , माझे रोजचे १७ तास शूटींग आणि प्रवासात जातात, त्यामूळे गेले काही दिवस प्रत्यक्ष भेटुन एकमेकांनशी गप्पाच झाल्या नाहीत.. काल बाहेर ४१ डिग्री तापमान होत, आणि मी out door ला शूटींग करत होतो, फाईट सिक्वेन्स करत होतो, दिवसभर हे सुरू होत. ऊन प्रचंड असल्यामुळे प्रोडक्शने विशेष काळजी घेतली होती.( लिंबू पाणी, थंड पाणी, पंखे,) तरी त्रास होत होता.. ४१ डिग्री मध्ये जमिनीवर अनवाणी पायाने मला धावा धाव करायची होती. तळपत्या उन्हात पाय ठेवणं म्हणजे जळत्या कोळशावरती पाय ठेवल्या सारख वाटत होत, सकाळी ७ वाजेपासून सुरु झालं ते संध्याकाळी ५.३० वाजता संपलं, घरी आलो माझा थकलेला चेहरा बघुन आई नी डोक्याला तेल लाऊन दिलं, गरम गरम चहा दिला, खूप थकलो असल्यामुळे थोड्याच वेळ गप्पा मारून झोपलो, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी शूटींग ला जायचं होत, मला झोप लागली, साधारण मध्य रात्री माझ्या पायाला कोणीतरी काही तरी करतय हे जाणवलं, मी जागा झालो तर, माझी बायको माझ्या तळपायाला "कैलास जीवन" लावत होती. कारण उन्हात पळून माझ्या पायाला बऱ्या पैकी दुखापत झाली होती, मी घरी सांगितलं नव्हतं, जे घरातल्या घरात मी चालत होतो, त्या वरून माझ्या बायकोला जाणीव झाली होती, की ह्याला त्रास होतोय, तिने ३ ते ४ वेळा विचारलं सुद्धा पायाला तेल किंव्हा क्रीम लाऊन देऊ का? मी म्हटल नको नंतर मी लावीन आणि हे बोलुन मी गाढ झोपून गेलो, तर मध्यरात्री तू माझ्या पायाला कैलास जीवन लावत होतीस, ह्या आणि अश्या बऱ्या गोष्टी आहेत ज्या माझ्या साठी तू न सांगता करतेस, आपलं लग्न होण्याच्या आधी ४ वर्ष रिलेशन मध्ये होतो, तेव्हा सुद्धा अश्या बऱ्याच गोष्टी तू माझ्या साठी केल्या आहेस, काल म्हणजे तू जे केल आहे ते म्हणजे खरच.. माझ्या कडे शब्द नाही आहेत.. माझं खरच भाग्य आहे की, तुझ्या सारखी बायको, मैत्रीण माझ्या आयुष्यात आहे, तू मला जो सपोर्ट करतेस, ज्या प्रकारे माझ्या मागे खंबीपणे उभी राहते आहेस, त्यामुळे मी इतका पळू शकतो आहे..तुला मला thank you म्हणायचं नाहीये कारण ते तुला आवडणार नाही.. पण सगळ्यांन समोर i love you नक्कीच म्हणीन..(आपली माणसं आपल्यासाठी नकळत खूप काही करत असतात आपण परतफेड नाही करू शकत किमान आपण त्याच्या बद्दल दोन शब्द लिहू नक्कीच शकतो)

झी मराठीवरील 'मन उडू उडू झालं' ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. या मालिकेनं प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. काही महिन्यांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मात्र आजही प्रेक्षक या मालिकेतील कलाकारांना विसरू शकलेले नाही. मालिकेतील इंद्रा आणि दिपूची जबरदस्त केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली. मालिकेत ऋतुराजने कार्तिकची भूमिका साकारली होती. काही दिवसांपूर्वी ऋतुराज फडकेने 'झोलझाल' या मराठी सिनेमामध्ये काम केलं होतं.  तर ऋतुराज सध्या '३६ गुणी जोडी' मालिकेत दिसत आहे.

टॅग्स :टिव्ही कलाकारलग्नपती- जोडीदार