Join us

आशियातील सर्वात मादक अभिनेत्री बनणार एकता कपूरची नागिन, पाहा तिचे बोल्ड फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 06:30 IST

आशियातील दुसऱ्या मादक स्त्रीचा किताब मिळवणारी टीव्हीवरची सर्वाधिक बोल्ड अन् ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे.

नागिन ही मालिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. या मालिकेची लोकप्रियता पाहाता या मालिकेचा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या सिझनला देखील प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि आता या मालिकेचा चौथा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आजतकच्या रिपोर्टनुसार यात मुख्य भूमिकेत निया शर्मा दिसणार आहे.

रिपोर्टनुसार निया शर्माचे नाव फायनल करण्यात आले आहे. निया इश्क में मरजावां या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसली होती.  आशियातील दुसऱ्या मादक स्त्रीचा किताब मिळवणारी २७ वर्षांची निया शर्मा टीव्हीवरची सर्वाधिक बोल्ड अन् ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून परिचित आहे.

‘एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. यानंतर ती ‘जमाई राजा’ या मालिकेत दिसली. यापाठोपाठ ‘खतरों के खिलाडी’च्या आठव्या सीझनमध्येही ती दिसली. निया कायम तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असते.

सोशल मीडियावर निया कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत. सध्या ती ‘इश्क मे मरजावाँ’ मध्ये आरोहीची भूमिका साकारते आहे. 2017 मध्ये ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’च्या यादीत निया तिस-या स्थानावर होती. पण 2018 मध्ये मात्र तिने तिस-या स्थानावरून दुस-या स्थानावर उडी घेतली होती.लंडन येथील ’इस्टर्न आय’ या मॅगझिनने ही 50  ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’ची यादी जाहीर केली होती. 

टॅग्स :नागिन 3निया शर्मा