बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनची सध्या जोरात चर्चा आहे. या सीझनमध्ये असलेल्या कलाकारांनी घरात पहिल्याच आठवड्यात कल्ला केलाय. बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये पहिल्या दोन दिवसातच वर्षा उसगावकर - निक्की तांबोळीमध्ये कडाक्याचं भांडण झालं. निक्कीने बेडवर झोपण्यावरून वर्षा उसगावकर यांचा चांगलाच अपमान केला. पुढे वर्षा यांनीही सौम्य भाषेत तिला उत्तर दिलं. पण आता बिग बॉस मराठीच्या नवीन प्रोमोमध्ये वर्षा-निक्की या दोघींची गट्टी जमलेली दिसतेय.
बाssई म्हणत निक्की तांबोळीने घरात लक्ष वेधलं
बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनचा नवा प्रोमो रिलीज झालाय. यात निक्की बाssई म्हणत घरातल्या सदस्यांना कशी हसवत आहे, हे पाहायला मिळतं. पुढे वर्षा उसगावकर- धनंजय पोवार आणि निक्की तांबोळी बाथरुममध्ये असतात. तिथे 'बाssई गं' असं वर्षा उसगावकर गाताना दिसतात. पुन्हा निक्की बाssई असं म्हणताच धनंजय खळखळून हसायला लागतो. निक्कीसुद्धा हसत हसत थेट खालीच बसते.
वर्षा-निक्कीमध्ये झाली मैत्री?
बिग बॉस मराठीचा हा नवीन प्रोमो पाहून सर्वांनी अंदाज बांधलाय की, वर्षा आणि निक्कीमध्ये चांगली मैत्री झालेली दिसतेय. दोघीही एकमेकांसोबत वेळ घालवत असून हशामस्करी करताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासूनच वर्षा-निक्कीमध्ये चांगलीच खडाजंगी झालेली दिसली. बेडवर झोपण्यावरुन, पुढे मेकअप करण्यावरुन नंतर नॉमिनेशन टास्कवेळी वर्षा-निक्की यांच्यात शाब्दिक चकमक झाली. ती दूर होऊन दोघींमध्ये मैत्री झाली, अशी अटकळ बिग बॉसचे फॅन्स बांधत आहेत.