फेब्रुवारीला प्रेमाचा महिना म्हणतात, कारण या महिन्यात, संपूर्ण जगातील प्रत्येक व्यक्ती प्रेमाच्या रंगात रंगते. ७ ते १४ फेब्रुवारीपर्यंत अनेक प्रेमळ दिवस साजरे केले जातात. प्रेमाचा हा उत्सव एक-दोन दिवस नाही तर पूर्ण सात दिवस चालतो. याला व्हॅलेंटाईन वीक ( Valentine's Week) म्हणतात. या काळात आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे, त्यांच्यासोबत खास वेळ घालवला जातो. प्रेम व्यक्त केलं जातं. प्रेमी युगुलांना काळजी वाटू लागते की, आपल्या खास व्यक्तीला कसं खुश करता येईल आणि प्रत्येक दिवस कसा खास बनवता येईल. फक्त सामान्य तरुण तरुणी नाही तर सेलिब्रिटी कपलदेखील हा व्हॅलेंटाईन वीक साजरा करतं. अभिनेत्री निक्की तांबोळी आणि अरबाज पटले यांनीही सुंदर सेलिब्रेशन केलंय.
अरबाज पटेलनं एक रोमँटिक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. स्काय फोर्स चित्रपटातील "तू है तो मैं हूँ" हे गाणं जोडलं आहे. तर "तू इश्क है तो मैं बाँहों में", असं कॅप्शन या व्हिडीओला अरबाजनं दिलं. यात निक्की आणि अरबाज खास एकत्र क्षण घालवताना पाहायला मिळत आहेत. व्हिडीओमध्ये निक्की आणि अरबाज दोघं वेगवेगळ्या आउटफिटमध्ये पाहायला मिळत आहेत. निक्कीनं सुंदर गुलाबी रंगाचा वनपीस परिधान केलाय. ज्यात प्रचंड हॉट दिसतेय. तर अरबाज हा पांढऱ्या रंगाच्या शर्टमध्ये हॅन्डसम दिसतोय. व्हिडीओमध्ये संपुर्ण खोली ही रेड हार्ट बलूनने सजवलेली दिसतेय. दोघे रोमँटिक डान्स करतानाही दिसून येताय. दोघांचा हा व्हिडीओ प्रचंड चर्चेत आलाय.
'बिग बॉस' मराठीच्या पाचव्या पर्वात निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या स्पर्धकांपैकी होते. 'बिग बॉस मराठी'च्या या पर्वाने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी निक्की-अरबाजची जोडी सतत चर्चेत येत असते. निक्की आणि अरबाजच्या जोडीला भरभरून प्रेम मिळताना दिसून येत. दोघंही एकमेकांसोबत फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. 'बिग बॉस मराठी'मधून बाहेर आल्यानंतर आता निक्की 'सेलिब्रिटी मास्टर शेफ' (Celebrity Master Chef ) यात दिसतेय. आपल्या कुकिंगने ती प्रेक्षकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करतेय. पण, शेवटपर्यंत ती टिकणार का हे पाहावं लागेल.