Join us

Nikki Tamboli : निक्की तांबोळी अन् छत्रपती संभाजीनगरचं कनेक्शन माहितीये का ? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 2:16 PM

निक्कीला 'मराठी बिग बॉस'मध्ये पाहून सर्वजण आनंदी झाले आहेत.

Nikki Tamboli in Bigg Boss Marathi : बहुप्रतिक्षित 'बिग बॉस मराठी'च्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे.  यंदा 'बिग बॉस मराठी'च्या होस्टिंगची जबाबदारी रितेश देशमुख सांभाळतोय. गेल्या काही दिवसांपासून यावर्षी स्पर्धक म्हणून घरात कोण प्रवेश करणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर रविवारी रात्री पार पडणाऱ्या ग्रँड प्रीमियर सोहळ्यात याचा उलगडा झाला आहे.  'बिग बॉस मराठी' घरात अभिनेत्री निक्की तांबोळीने (Nikki Tamboli ) एन्ट्री घेतली आहे. 'हिंदी बिग बॉस'नंतर 'मराठी बिग बॉस' गाजवायला आलेल्या निक्कीचं छत्रपती संभाजीनगरशी (Nikki Tamboli Chhatrapati Sambhajinagar connection) खास कनेक्शन आहे. तर याबद्दल आपण जाणून घेऊया. 

आता निक्कीला 'मराठी बिग बॉस'मध्ये पाहून सर्वजण आनंदी झाले आहेत. एक बोल्ड अभिनेत्री म्हणून निक्कीला ओळखलं जातं. तुम्हाला माहितेय सध्या डोंबिवलीमध्ये राहत असलेली निक्कीही मुळची छत्रपती संभाजीनगरची आहे. निक्कीचा जन्म २१ ऑगस्ट १९९६ रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. तिने छत्रपती संभाजीनगरमध्येच शालेय आणि पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. निक्कीचे वडिल हे व्यावसायिक असल्याची माहिती आहे. 

निक्कीने मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली आणि नंतर टीव्ही जाहिरातींमध्ये काम केलं. यासोबतच 'कंचना 3', 'चिकती गदिलो चित्रकोट्टु' आणि 'थिप्पारा मीसम' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.  तसंच नक्की 'खतरों के खिलाडी' या शोमध्येही सहभागी झाली होती. निक्की ही 'बिग बॉस हिंदी'च्या 14 व्या सीझनमध्ये सहभागी झाली होती. यात ती टॉप 3 पर्यंत पोहोचली होती. पण तिला या शोचं विजेतेपद पटकावता आलं नाही. 'हिंदी बिग बॉस'नंतर निक्की 'मराठी बिग बॉस'मध्ये काय हवा करते हे पाहणं महत्वाचं आहे.

टॅग्स :बिग बॉसबिग बॉस मराठीसेलिब्रिटीटेलिव्हिजनकलर्स मराठीऔरंगाबाद