Join us  

Bigg Boss Marathi : ग्रँड फिनालेतून चौथं Eviction! टॉप २ मध्ये पोहचले 'हे' सदस्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2024 8:44 PM

'बिग बॉस मराठी'चा ग्रँड फिनाले सध्या दणक्यात सुरू आहे.

BB Marathi Grand Finale: 'बिग बॉस मराठी'चा ग्रँड फिनालेची दमदार सुरूवात झाली. दोन आठवड्यांच्या ब्रेकनंतर रितेश देशमुखने ग्रँड एन्ट्री घेतली आहे.  लवकरच महाराष्ट्राला 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा विजेता मिळणार आहे.  एकामागोमाग एक सदस्य बाहेर जात आहे. जान्हवी किल्लेकर, अंकिता वालावलकर, धनजंय पोवार यांची घरातून एक्झिट घेतली. आता निक्की तांबोळीचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला आहे. त्यामुळे निक्कीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 

 'बिग बॉस'च्या घरावर राज्य करणारी निक्की तांबोळी फिनालेमध्ये पोहचली. त्यानंतर तिने टॉप ३ मध्येही आपलं स्थान बनवलं. पण, ती टॉप २ मध्ये पोहचू शकली नाही. 'बिग बॉस मराठी'च्या घरात अगदी पहिल्या दिवसापासून निक्कीचा खेळ आणि तिची संपुर्ण महाराष्ट्रभर चर्चा होती. निक्कीने स्वतःच्या हटके स्टाईलने आणि आपल्या दमदार खेळाने बिग बॉसच्या घरात स्थान भक्कम केलं होतं. 

वर्षा उसंगावकराशी वाद, आर्या जाधवसोबतचं भांडण ते अरबाजवरचं प्रेम,  या संपुर्ण प्रवासात निक्कीने अनेकांशी वाद घातले, कचाकच भांडली. एवढंच काय तर खंबीर असलेली प्रेक्षकांना रडतानाही दिसून आली. 'बिग बॉस'मराठीच्या घरात तिने आपला गेम दाखवला. संपुर्ण महाराष्ट्रालाही वेड लावलं.  एवढंच काय तर सोशल मीडियावरही निक्कीच्या खास शैलीतील 'बाईSSS'  आणि 'हा काय प्रकार' हे डॉयलॉग चांगलेच व्हायरल झालेत.

निक्कीने लोकांच्या मनात स्थान तर मिळवलं. पण, तिचं 'बिग बॉस मराठी'ची ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न मात्र भंगल. याआधी निक्की ही 'बिग बॉस हिंदी' 14 व्या सीझनमध्ये सहभागी झाली होती. त्या सीझनमध्येही ती  टॉप 3 पर्यंत पोहोचली होती. पण तिला या शोचं विजेतेपद पटकावता आलं नव्हतं. आता निक्कीनंतर अभिजीत आणि सुरज हे दोन सदस्य टॉप २ मध्ये पोहचले आहे.  त्यामुळे कोणाच्या हातात 'बिग बॉस'ची ट्रॉफी येते, याकडे सर्वांचं लक्ष आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीरितेश देशमुखसेलिब्रिटी