बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये निक्की तांबोळीने पहिल्या आठवड्यात घरात चांगलाच राडा केलेला दिसला. इतकंच नव्हे तर तिचा वर्षा उसगावकरांसोबत रंगलेला वादामुळे घरातलं वातावरण चांगलंच तापलं. पहिल्या आठवड्यात रितेशने निक्कीला चांगलंच सुनावलं. इतकंच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची निक्कीला माफी मागायला लावली. दुसऱ्या आठवड्यात मात्र घरात हलकंफुलकं वातावरण बघायला मिळतंय. निक्कीने सर्वांना तिची लिपस्टिकचं कलेक्शन
निक्कीकडे आहेत ७० प्रकारच्या लिपस्टिक! धनंजय म्हणाला...
बिग बॉस मराठीच्या घरात सध्या दोन गट पडले असून नुकत्याच आलेल्या प्रोमोत पाहायला मिळतं आहे की, बिग बॉस मराठीच्या घरात निक्कीच्या मेकअपची मोजणी होणार आहे. समोर आलेल्या प्रोमोत दिसतंय की, धनंजय पोवार निक्कीला तिच्या मेकअपचे साहित्य काढायला सांगत आहे. त्या मेकअपच्या साहित्याची मोजणी करणार आहे. ७० प्रकारच्या लिपस्टिक निक्कीच्या बॅगमध्ये बघून तो चकित होताना दिसत आहे. निक्की आणि वर्षाताईंना मेकअपवरून बोलल्यानंतर बिग बॉस मराठीच्या घरात यावरून वाद होईल का? हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
धनंजयने केलेल्या मस्करीची कुस्करी होणार?
DP म्हणून लोकप्रिय असलेल्या धनंजय पोवारने निक्कीशी मस्करी करताना वर्षा उसगावकरांचंही नाव घेतलं. वर्षा उसगावकरांच्या चेहऱ्यावरुन स्पष्ट दिसतंय की त्यांना ते आवडलेलं नाही. त्यामुळे धनंजयने केलेल्या मस्करीची कुस्करी होणार का? हे जाणून घेणे रंजक ठरणार आहे. बिग बॉस मराठीमध्ये दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशीही चांगलाच राडा होणार आहे. सूरज आणि जान्हवी एकमेकांना हडतूड करताना दिसणार आहेत.