Join us  

'हसताय ना? हसायलाच पाहिजे'च्या सेटवर निलेश साबळे झाला मेकअप मॅन, म्हणतो- "मनोरंजन हे असं क्षेत्र आहे..."

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 11:26 AM

'हसताय ना? हसायलाच पाहिजे'च्या मंचावरील एक व्हिडिओ समोर आला आहे. सूत्रसंचालन आणि अभिनय करताना दिसणारा डॉक्टर या व्हिडिओत मेकअप मॅन झाल्याचं पाहायला मिळत आहे.

निलेश साबळे हे मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय नाव आहे. पेशाने डॉक्टर असलेल्या निलेश साबळेने त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभिनयाची वाट धरली. चला हवा येऊ द्या या शोमुळे निलेश साबळे प्रसिद्धीझोतात आला. या शोमुळे त्याच्या लोकप्रियतेत वाढ झाली. गेली अनेक वर्ष तो प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहे. 'चला हवा येऊ द्या' बंद झाल्यानंतर निलेश साबळे 'हसताय ना? हसायलाच पाहिजे' या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

अफलातून विनोदबुद्धी आणि अभिनयाची उत्तम जाण असणाऱ्या निलेश साबळेचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. सोशल मीडियावरही तो प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नुकतंच त्याने 'हसताय ना? हसायलाच पाहिजे'च्या मंचावरील एक व्हिडिओ शेअर केला आहे. सूत्रसंचालन आणि अभिनय करताना दिसणारा डॉक्टर या व्हिडिओत मेकअप मॅन झाल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडिओत डॉक्टर भाऊ कदम आणि ओंकार भोजनेचा मेकअप करताना दिसत आहे. निलेश साबळे त्यांना मिशी काढत असल्याचं पाहायला मिळतंय. हा व्हिडिओ शेअर करत त्याने "मनोरंजन हे असं क्षेत्र आहे, ज्यातलं सगळंच मला आवडतं", असं म्हटलं आहे. 

'चला हवा येऊ द्या' शोमधून भाऊ कदम आणि निलेश साबळेला प्रसिद्धी मिळाली. तर महाराष्ट्राची हास्यजत्रामधून ओंकार भोजने घराघरात पोहोचला. तब्बल १० वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर चला हवा येऊ द्या शोने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर कलर्स मराठीवरील 'हसताय ना? हसायलाच पाहिजे' या शोमधून निलेश साबळे आणि भाऊ कदम प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. 

टॅग्स :निलेश साबळेटिव्ही कलाकारभाऊ कदममराठी अभिनेता