Join us

'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' हा नवा कार्यक्रम कधी अन् कुठे सुरू होणार ? जाणून घ्या…

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 10:09 IST

विनोदाचा हा पॅावरबाज डोस घेण्यासाठी सज्ज रहा.

महाराष्ट्राचा अत्यंत लाडका विनोदाचा बादशाह अर्थात डॅा. निलेश साबळे हे आता आणखी एक नवा कोरा कॉमेडी शो घेऊन येत आहेत.  'हसताय ना? हसायलाच पाहिजे' असं या कॉमेडी शोचं नाव असून यातून निलेश साबळे, भाऊ कदम आणि ओंकार भोजने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तर हा कार्यक्रम कधी आणि कुठे सुरू होणार हे जाणून घेऊया. 

नुकतंच या कॉमेडी शोचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. 'कलर्स मराठी' वाहिनीवरील हा विनोदाचा अ‍ॅटमबॉम्ब आता २७ एप्रिलपासून सुरू होणार आहे. शनिवार आणि रविवार रात्री नऊ वाजता हा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे या खास कार्यक्रमात अभिनेते भरत जाधव आणि ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल आठल्ये हे दोन महान कलाकार दर भागामधे सेलिब्रिटी पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला दाद देण्यासाठी लाभणार आहेत. 

डॉ. निलेश साबळे आणि भाऊ कदम यांनी आपल्या बहारदार विनोदाने अवघ्या महाराष्ट्राला हसवलं. केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरात त्यांचे चाहते आहेत. तर ओंकार भोजनेही आपल्या खास शैलीमुळे प्रेक्षकांचा लाडका झाला.  आता विनोदाचे हे तीन हुकमी एक्के एकत्र येऊन पुन्हा एकदा नव्या जोशात , नव्या जल्लोषात प्रेक्षकांना खळखळून हसवायला येत आहेत. त्यामुळे विनोदाचा हा पॅावरबाज डोस घेण्यासाठी सज्ज रहा. 

टॅग्स :निलेश साबळेसेलिब्रिटीभाऊ कदमकलर्स मराठी