'मै मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो' हा सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय मालिका आहे. सध्या या मालिकेत रुसलान मुमताज निभावत असलेल्या ध्रुव रायचंदच्या एंट्रीने एक रोचक वळण लागले आहे. तो एक एनआरआय आहे आणि तो लगेच जयाच्या प्रेमात पडला आहे. निलू वाघेलाचे पात्र असलेल्या सत्या देवीला समर अजिबात आवडत नसल्याने ध्रुव तिचा आवडता झाला आहे. निलू वाघेला ही सर्व कलाकारांची आवडती आणि उत्तम कलाकार आहे. कार्यक्रमात नुकत्याच एंट्री घेतलेला रुसलान मुमताज निलूच्या व्यक्तिमत्वावर फिदा झाला आहे आणि त्यांच्यात सुद्धा त्वरित चांगले संबंध तयार झाले. निलू आणि रुसलान ह्यांना फक्त पडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यातही एकमेकांची कंपनी आवडते. अगदी कमी वेळात त्यांच्यात एक चांगला बॉण्ड तयार झाला आहे आणि ते दोन शॉट्सच्या मधल्या वेळेत सेटवर भटकत असतात. रुसलान एखाद्या लहान मुलासारखा खोड्या काढत असतो पण त्याचबरोबर तिच्याकडून अभिनयाचे धडेही घेत असतो.
निलू वाघेला ह्या अभिनेत्याला मानते स्वतःचा मुलगा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 8:30 PM