सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) शोने महाराष्ट्रातच नाही तर जगभरात लोकप्रियता मिळवली आहे. या कार्यक्रमाचा नुकताच अमेरिकेत दौरा झाला. या शोमधील विनोदवीर सातत्याने चर्चेत येत असतात. दरम्यान काही दिवसांपूर्वी या शोमधील लोकप्रिय कलाकार शिवाली परब (Shivali Parab) आणि निमिष कुलकर्णी (Nimish Kulkarni) एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यावर आता निमिष कुलकर्णीने मौन सोडले आहे.
निमिष कुलकर्णीने कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनेलला सांगितले की, जेव्हा शिवालीसोबतच्या अफेअरच्या बातम्या आल्या होत्या, तेव्हा या सेटवरच्या १५ जणांनी तरी त्या मला पाठवल्या होत्या. पण त्या वेगवेगळ्या वृत्तसंस्थेच्या बातम्या पाठवल्या. हे काय आहे? निमिष हे खरं आहे का?, असं प्रत्येकांनी त्या बातम्यांच्या खाली लिहिले होते. पण, ही अफवा आहे. अजिबात असे काही नाही. आम्ही खूप चांगले फ्रेंड आहोत. उद्या साक्षीने जरी माझ्याबरोबर स्टोरी टाकली, तरी तुम्ही असे काही समजू नका. आम्हाला एकत्र खूप चांगले काम करायचे आहे, मात्र ती अफवा खूप एन्जॉय केली होती.
अशी सुरु झाली चर्चा...शिवाली परबने काही महिन्यांपूर्वी इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला होता. ज्यात शिवालीने निमिषचा हात हातात पकडला होता. हा फोटो शेअर करत तिने म्हटले होते की, माझ्या निब्बाबरोबर डेट. क्युट बेबी असे हॅशटॅगही मेंशन केले होते. या फोटोनंतर शिवाली आणि निमिष एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.
वर्कफ्रंटबद्दलनिमिषच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं, तर तो ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रा’नंतर ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकांमध्ये झळकला. पण, आता ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेनेही प्रेक्षकांचा निरोप घेतला असून निमिष पुन्हा एकदा ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.