सध्या लग्नाचा मोसम सुरु आहे. सगळीकडे लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. सेलिब्रिटीसुद्धा याला अपवाद नाहीत. ‘निम्की मुखिया’ मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री भूमिका गुरुंग हिचे लग्न ठरले असून नुकतेच तिचा साखरपुडा झाला आहे. मात्र तिने लग्न ठरले असल्याचे तिने कोणाला कानोकान खबरही लागु दिली नाही. असे असले तरीही तिने आपले लग्न अजून पार पडलेले नसल्याचा खुलासा केला आहे. भूमिका गुरुंग म्हणाली, “माझा रोका (साखरपुडा) समारंभ झाला असला, तरी लग्न अजून व्हायचं आहे.”
नृत्यदिग्दर्शक अभिनेता अमितसिंह गोसान ऊर्फ कीथ याच्याबरोबर भूमिकाचे गेली पाच वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. भूमिका म्हणाली, “कीथ आणि मी आता गेली पाच वर्षं एकत्र राहात आहोत. त्यामुळे लपूनछपून लग्न करण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. आमच्या दोघांचे पालक एकमेकांना अनेकदा भेटले आहेत. तेव्हा लग्नाची अशी काही घाई नाही. आपला पती आणि जीवनाच्या जोडीदाराकडून मला हव्या असलेल्या सा-या गोष्टी कीथमध्ये असल्याने मी स्वत:ला सुदैवी समजते. अर्थात रोका समारंभाचा निर्णय अचानक ठरला, त्यामुळे आम्ही तो केवळ निकटच्या नातेवाईकांच्या उपस्थितीतच पार पाडला.”
काही महिन्यांपूर्वी या दोघांचे संबंध संपुष्टात आल्याच्या अफवाही उठल्या होत्या. भूमिकाने इन्स्टाग्रामवर प्रसृत केलेल्या काही छायाचित्रांवरून या दोघांमध्ये सारे काही आलबेल नाही, असे दिसून आले होते. त्याबाबत भूमिका म्हणाली, “तो आमच्यातील फक्त एक वाद होता, इतकंच.” साखरपुडा झाल्यानंतर सनई चौघडे कधी वाजणार अर्थात त्यांच्या लग्नाची तारीख काय हे अद्याप समोर आलेले नाही. आपल्या विवाहाबाबत भूमिका म्हणाली, “आम्ही लग्नाची तारीख अजून निश्चित केलेली नाही. आम्ही आपापल्या कारकीर्दीत अजून काहीसे स्थिरावेपर्यंत लग्न लांबणीवर टाकता येते. पण पुढील महिन्यात आमचा साखरपुडा होणार आहे.”
भूमिका आणि कीथ लवकरच विवाहबध्द होतील. पण तिला तिच्या लग्नाच्या योजनेबद्दल विचारले असता ती म्हणाली, “एका कॉमेन फ्रेंडमुळे काही वर्षांपूर्वी मी कीथला भेटले. तेव्हापासून आमच्यात फार छान, प्रेमाचं नातं निर्माण झालं आहे. लग्नानंतरही मी अभिनय क्षेत्रात काम करतच राहणार आहे. वास्तव जीवनातही मी माझ्या पडद्यावरील निम्की या व्यक्तिरेखे सारखीच आहे.”