उत्कंठावर्धक कथानक आणि वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिरेखांमुळे' छोट्या पडद्यावर ‘निम्की मुखिया’ मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली आहे.पण यामालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक वाईट बातमी आहे; ती अशी की या मालिकेतील एक खूपच लोकप्रिय व्यक्तिरेखा आता मालिका सोडणार आहे. निम्कीची सासू अनोरादेवीची भूमिका साकारणारी अभिनेत्री गरिमा विक्रांत सिंहने ही मालिका सोडली आहे.
गरिमा सिंहने मालिकेतील आपल्या अखेरच्या प्रसंगाचे चित्रीकरण संपविले आहे. तिचे निर्मात्यांशी ब-याच दिवसांपासून काही वाद होते, असे सांगितले जाते. परंतु निर्मात्यांनी हे वाद मिटविण्यासाठी कोणतीही पावले उचलली नाहीत,तेव्हा गेल्या महिन्यात ही मालिका सोडण्याचा निर्णय तिने घेतला.मालिकेत तिची व्यक्तिरेखा अतिशय महत्त्वाची असल्याने आता गरिमा सिंहच्या जागी दुसर-या कलाकाराची निवड करायची की ही व्यक्तिरेखाच मालिकेतून काढून टाकायची असा प्रश्न निर्मात्यांपुढे उभा राहिला आहे.
यासंदर्भात गरिमा विक्रांत सिंह हिच्याशी संपर्क सधला असता तिने ‘आयडब्ल्यूएमबझ.कॉम’ संस्थेकडे मालिका सोडण्याच्या वृत्ताला दुजोरा देताना सांगितले, “हो, ही मालिका मी सोडली आहे.30 जुलै हा माझा या मालिकेच्या चित्रीकरणाचा अखेरचा दिवस होता. मला ही मालिका अतिशय प्रिय होती. पण या मालिकेच्या चित्रीकरणासाठी माझ्याकडील तारखांचा योग्य त-हेने वापर केला जात नव्हता.
मला झामाजी यांच्याबरोबर काम करण्याची तीव्र इच्छा असल्यामुळेच मी हा त्रास ब-याच महिन्यांपासून सहन करीत आले आहे. आतासुध्दा माझ्याकडील तरखांचा वापर पुरेशा प्रमाणात केला जात नसतानाही मी त्यांच्याशी पूर्ण सहकार्य करीत होते. पण मालिकेत माझं अस्तित्त्व वाढविण्याचा दिवस कधी उगविलाच नाही.
मला अन्य मालिकांमध्ये मर्यादित प्रमाणात भूमिका साकारावयाची होती, पण मला त्यासाठी परवानगी नाकारण्यात आली. तेव्हा मी झामाजी यांच्याशी प्रत्यक्ष बोलून माझी बाजू मांडली, तेव्हा मला परवानगी देण्यात आली.” निम्कीच्या सासूची व्यक्तिरेखा मालिकेत कायम राहिल्यास गरिमा सिंहच्या जागी कोणत्या कलाकाराची निवड होते, ते पाहणे रंजक ठरेल.