स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte ). या मालिकेनं नुकतेच शेवटचे शूटिंग संपवले असून ही मालिका ३० नोव्हेंबरला प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. तब्बल ५ वर्षे सुरू असलेल्या या मालिकेतील कलाकारांना शेवटच्या दिवशी निरोप घेणं खूप अवघड केले. यातील कलाकार सतत मालिकेच्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहेत. दरम्यान या मालिकेत अभिषेकची भूमिका साकारणारा अभिनेता निरंजन कुलकर्णी () समृद्धी बंगल्यावर गेला होता. तिथला व्हिडीओ शेअर करत त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट चर्चेत आली आहे.
अभिनेता निरंजन कुलकर्णीने 'आई कुठे काय करते'चा सेट समृद्धी बंगल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात येथील सर्व सेट काढून टाकल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच सामान सॉर्ट करून ठेवताना दिसत आहे. त्याने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, wrap up. आई कुठे काय करते मालिकेचा सेट आणि आमचा समृद्धी बंगला. या बंगल्याच्या कोपऱ्या कोपऱ्यात आमच्या आठवणी आहेत आणि आमच्या बरोबरच प्रेक्षकांच्या सुद्धा अनेक आठवणी या समृद्धी बंगल्याने जपून ठेवल्या आहेत. आमच्याबरोबर आमचे मायबाप प्रेक्षकही या बंगल्यात राहत होते. या वास्तूला आमचं शेवटचं नमन. या पुढे इथे घडणाऱ्या कलाकृती,मालिका उत्तरोत्तर प्रगती करो हीच शुभेच्छा. वास्तु नेहमी तथास्तु म्हणते . !!श्री स्वामी समर्थ!!
५ वर्षांनी मालिका घेतेय निरोप२३ डिसेंबर २०१९ रोजी 'आई कुठे काय करते' मालिकेचा पहिला एपिसोड प्रसारित झाला होता. मधुराणी प्रभुलकरने या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारली. तर मिलिंद गवळी अनिरुद्ध आणि रुपाली भोसले संजनाच्या भूमिकेत होती. अश्विनी महांगडे, अपूर्वा गोरे, निरंजन कुलकर्णी, अभिषेक देशमुख, कौमुदी वलोकर या कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. आता ५ वर्षांनी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. ३० नोव्हेंबरला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे.