Join us

Nitesh Pande Death : नितेश पांडेंची पहिली बायको होती 'ही' मराठमोळी अभिनेत्री, चार वर्षांतच झालेला घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 1:50 PM

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता नितेश पांडेचा काल रात्री हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला.

'अनुपमा' मालिकेत रुपाली गांगुलीची मैत्रिण देविकाच्या पतीची भूमिका साकारणाऱ्या नितीश पांडे(Nitesh Pandey)चे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्याचा मृत्यू झाला. ते ५१ वर्षांचे होते. त्याच्या निधनामुळे टेलिव्हिजन जगतावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या अभिनयाचे अनेक जण चाहते आहेत. मालिका असो किंवा सिनेमातील छोटीशी भूमिका त्यांनी प्रत्येक ठिकाणी आपली छाप पाडली. त्यांच्या अचानक जाण्याने प्रत्येकालाच धक्का बसला आहे.

नितेश पांडे यांचं करिअर 

1995 साली नितेश पांडे यांनी टीव्ही जगतात प्रवेश करत अभिनयाला सुरुवात केली. सध्या ते 'अनुपमा' या लोकप्रिय मालिकेत काम करत होते. याआधी त्यांनी 'साया', 'मंजिल अपनी अपनी','जुस्तजू','प्यार का दर्द है','कुछ तो लोग कहेंगे' अशा अनेक मालिकांमध्ये भूमिका साकारल्या. याशिवाय त्यांनी 'मेरे यार की शादी है' या सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. नंतर 'ओम शांती ओम','खोसला का घोसला',शादी के साईड इफेक्ट्स','मदारी' अशा काही सिनेमांमध्येही भूमिका साकारली. 

नितेश पांडेंचं वैयक्तिक आयुष्य 

नितेश पांडेने 1998 साली अभिनेत्री अश्विनी काळसेकरशी (Ashwini Kalsekar) लग्नगाठ बांधली. अश्विनी काळसेकर 'गोलमाल' सिनेमातील भूमिकेमुळे प्रसिद्ध आहे. मात्र नितेश आणि अश्विनी यांचं लग्न केवळ ४ वर्षच टिकलं. 2002 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर नितेश यांनी 2003 मध्ये अर्पिता पांडेशी लग्नगाठ बांधली. अर्पिता देखील अभिनेत्री असून दोघंही 'जुस्तजू' मालिकेच्या सेटवर भेटले होते.

नितेश यांचा जन्म 17 जानेवारी 1976 रोजी झाला. त्यांनी 90 च्या दशकात थिएटरमध्ये कामाला सुरुवात केली. ‘तेजस’ या मालिकेतून त्यांनी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं होतं. ‘मंजिले अपनी अपनी’, ‘जुस्तजू’ आणि ‘दुर्गेश नंदिनी’ यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या. नितेश यांचं स्वत:चं प्रॉडक्शन हाऊससुद्धा आहे. ‘ड्रिम कासल प्रॉडक्शन’ ही त्यांची निर्मिती संस्था आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारमृत्यूमराठी अभिनेता