Nitesh Rane Attend Ankita Walawalkar Wedding: 'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) फेम आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर (Social Media Influencer) 'कोकण हार्टेड गर्ल' (Kokan Hearted Girl) अंकिता वालावलकर (Ankita Prabhu Walawalkar) लग्नाच्या बंधनात अडकली आहे. बॉयफ्रेंड कुणाल भगतसोबत अंकितानं लग्नगाठ बांधली. अंकिता आणि कुणाल भगत (Kunal Bhagat) यांचा विवाहसोहळा कोकणात निसर्गाच्या सानिध्यात एका मंदिरात थाटामाटात पार पडला. या सोहळ्याला विद्यमान आमदार व कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी उपस्थिती लावली होती.
नितेश राणे यांनी अंकिता व कुणालला पुढील वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. नवदाम्पत्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांनी खास पोस्ट लिहिली आहे. त्यांनी लिहलं, "सिंधुदुर्गची सुकन्या ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर हिच्या लग्न सोहळ्यास उपस्थित राहून नवदांपत्यास पुढील वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या".
अंकिताच्या लग्नाची धामधूम गेल्या आठवडाभरापासून सुरु होती. अंकिताचं प्री-वेडींग आणि संगीत सोहळ्याच्या फोटो अन् व्हिडीओला लोकांची चांगलीच पसंती मिळाली.अंकिता वालावलकर मुळची कोकणातील मालवणातली. तर तिचा नवरा कुणालचं गाव अलिबाग आहे. कुणाल भगत हा मराठी सिनेविश्वातील संगीतकार आहे. 'येक नंबर' या सिनेमासाठी कुणालनं संगीत दिग्दर्शक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. तसेच, 'झी मराठी'च्या लोकप्रिय मालिकांना देखील त्यानं संगीत दिलं आहे.