Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही प्रेक्षकांची आवडती मालिका. पण सध्या मात्र चर्चा आहे ती या मालिकेतील कलाकारांची. होय, मालिकेतून दयाबेन दीर्घकाळापासून गायब आहेच. त्यानंतर गेल्या काही महिन्यांत अनेक कलाकारांनी मालिकेला रामराम ठोकला आहे. तारक मेहता ही भूमिका साकारणारे अभिनेते शैलेश लोढा यांनी काही दिवसांपूर्वी हा शो सोडला आहे. पाठोपाठ टप्पूची भूमिका साकारणाऱ्या राज अनादकट (Raj Anadkat ) यानेही मालिका सोडली. पण आता ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, मेकर्सला नवा टप्पू सापडला आहे. राज अनादकटच्या जागी मालिकेत नव्या टप्पूची एन्ट्री होतेय.
होय, टप्पूच्या रोलसाठी नितीश भलूनी (Nitish Bhaluni) याचं नाव कन्फर्म झाल्याचं कळतंय. लवकरच तो शोमध्ये दिसेल. लवकरच नितीश शोचं शूटींग सुरू करणार आहे. अर्थात अद्याप शोच्या मेकर्सनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. नितीशनेही याबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही.
टप्पू बनून नितीश प्रेक्षकांची मनं जिंकतो की नाही, हे लवकरच कळेल. नितीशने याआधी 'मेरी डोली मेरे अंगना' या मालिकेत काम केलंय. आता त्याची ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ वर्णी लागली आहे. साहजिकच हा नितीशसाठी मोठा ब्रेक ठरू शकतो. नितीश सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टीव्ह आहे. त्याला गाण्याचा आणि गिटार वाजवण्याचा छंद आहे. म्युझिकवरचं त्याचं प्रेम त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये स्पष्ट दिसतं.
डिसेंबर महिन्यात राज अनादकटने ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ला रामराम ठोकला होता. टप्पूची भूमिका साकारणारा राज 2017पासून मालिकेत काम करत होता. या आधी अभिनेता भव्य गांधी या मालिकेत टप्पू साकारत होता.