Join us  

सलमान खानला घाबरत नाही? अभिजीत बिचुकलेंचं खास इंग्रजीत उत्तर, म्हणाले - What I'm is...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 11:43 AM

अभिजीत बिचुकलेंनी नुकत्याच एका मुलाखतीत सलमान खान आणि बिग बॉसबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आहे (abhijeet bichukle)

महाराष्ट्रातील कवी मनाचे नेते अभिजीत बिचुकले सतत त्यांच्या वक्तव्याने इंडस्ट्रीत चर्चेत असतात. अभिजीत बिचुकले कायम राजकारण, समाजकारण संबंधित विषयांवर टीकाटिप्पणी करत असतात. अभिजीत हे बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमध्ये सहभागी होते. याशिवाय सलमान खान होस्ट करत असलेल्या बिग बॉसच्या १५ व्या सीझनमध्ये अभिजीत बिचुकले सहभागी होते. अशातच रेडीओ  सिटीला दिलेल्या मुलाखतीत अभिजीत यांनी सलमान खान आणि बिग बॉसविषयी केलेलं वक्तव्य चर्चेत आहे.

सलमान खानची भीती नाही वाटत? अभिजीत म्हणतात...

बिग बॉस 15 मध्ये अभिजीत बिचुकले सहभागी होते. हा शो संपल्यावर अभिजीत यांनी अनेक ठिकाणी सलमान खानबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली. याविषयी मुलाखतीत अभिजीत बिचुकलेंना सलमानची भीती नाही वाटत का? असं विचारलं गेलं. यावर अभिजीत बिचुकलेंनी यांनी इंग्रजी वाक्याचा वापर करत उत्तर दिलं की, "माझी इंडस्ट्रीतील फ्रेंडलिस्ट सलमान खानपासून सुरु होते.  what i'm is i'm. मी टीआरपी रेटिंग दिलं म्हणून मला शोमध्ये बोलावलं. मी शो चालवतो म्हणून मला नेतात लोक. ती एक कला आहे. यू हॅव टू बी सेलिब्रिटी. यू हॅव टू बी वेरी प्रोफेशनल. हे सर्व गुण माझ्याकडे आहेत."

बिचुकले बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये वाईल्ड कार्ड?

याच मुलाखतीत अभिजीत बिचुकलेंनी बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनविषयी भाष्य केलं. बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये वाइल्ड कार्ड जाणार का? विचारल्यावर बिचुकले म्हणतात, "बिग बॉस मराठीचा पहिला सीझन कोणालाही माहीत नव्हता. म्हणूनच दुसऱ्या सीझनमध्ये मला बोलवलं. आणि आजही बिग बॉसचे ३,४ आणि ५ सीझन झाले. तरीही अभिजीत बिचुकलेशिवाय बिग बॉस मराठी चालणार नाही. पाचव्या सीझनमध्येही ते मला १ लाख टक्के बोलवतीलच." आता बिचुकले खरंच बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये जाणार की नाही, याची सर्वांना उत्सुकता आहे.

 

टॅग्स :अभिजीत बिचुकलेसलमान खानबिग बॉसबिग बॉस मराठी