Join us  

सलमान खान नाही तर बॉलिवूडचा हा अभिनेता Bigg Boss OTT 3 करणार होस्ट, प्रोमो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 8:45 PM

Bigg Boss OTT 3: लोकप्रिय रिॲलिटी शो 'बिग बॉस' यंदा जूनपासून सुरू होणार आहे, मात्र त्याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिॲलिटी शो 'बिग बॉस' (Bigg Boss OTT 3) यंदा जूनपासून सुरू होणार आहे, मात्र त्याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. यावेळी सलमान खान (Salman Khan) 'बिग बॉस ओटीटी ३'मध्ये दिसणार नसून त्याऐवजी अनिल कपूर (Anil Kapoor) हा रिॲलिटी शो होस्ट करणार आहे. नुकताच निर्मात्यांनी या शोचा प्रोमो रिलीज केला आहे.

प्रेक्षक ‘बिग बॉस ओटीटी ३’ची आतुरतेने वाट पाहत होते. आता फायनल शोचा प्रोमो रिलीज झाला आहे. मात्र हा प्रोमो पाहून सलमान खानच्या चाहत्यांना धक्का बसू शकतो. याची पुष्टी झाली आहे आणि निर्मात्यांनी हे देखील स्पष्ट केले आहे की पहिला आणि दुसरा सीझन होस्ट केल्यानंतर सलमान खान आता तिसऱ्या सीझनमधून गायब होणार आहे. यावेळी तो या सीझनचा भाग असणार नाही.

अनिल कपूरने एका एपिसोडसाठी एवढी फी घेतली!एका रिपोर्टनुसार, अनिल कपूरने 'बिग बॉस ओटीटी ३' चा भाग होण्यासाठी एका एपिसोडसाठी २ कोटी रुपये मानधन आकारले आहे. तर हा शो होस्ट करण्यासाठी सलमान एका एपिसोडसाठी १२ कोटी रुपये मानधन घेत होता. अनिल कपूरचे चाहते त्याला सूत्रसंचालकाच्या भूमिकेत पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. मात्र सलमानच्या चाहत्यांना यात त्याला न पाहिल्याबद्दल नक्कीच खेद वाटेल.

हे स्पर्धक दिसण्याची शक्यताया शोमध्ये दिसलेल्या स्पर्धकांबद्दल बोलायचे झाले तर, यावेळी ओटीटीच्या सीझनमध्ये आशिष शर्मा, प्रतीक्षा होनमुखे, शहजादा धामी, विकी जैन, शिजान खान आणि अरहान बहल 'बिग बॉस ओटीटी ३'मध्ये स्पर्धक म्हणून येऊ शकतात. मात्र, अद्याप या नावांना दुजोरा मिळालेला नाही.

सलमान खान सध्या आहे बिझीदबंग सलमान खानबद्दल बोलायचे झाले तर, सध्या तो एआर मुरुगादासच्या 'सिकंदर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. तो त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये खूप व्यग्र आहे. याशिवाय त्याच्याकडे इतरही अनेक प्रोजेक्ट आहेत. यानंतर तो 'बिग बॉस १८' होस्ट करताना दिसू शकतो.

टॅग्स :सलमान खानअनिल कपूर