नीला फिल्म प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित तारक मेहता का उल्टा चष्मा मालिका आता मराठीत सादर करण्याची घोषणा केली आहे. डिसेंबर २०१९ च्या शेवटच्या आठवड्यापासून ‘फक्त मराठी या वाहिनीवर ‘गोकुळधामची दुनियादारी' म्हणून प्रसारित होणारा हा शो मूळचा डब व्हर्जन असेल. महाराष्ट्र आणि गोवा राज्यांमधील या शो प्रती असलेल्या लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर, या प्रॉडक्शन हाऊसने मराठी भाषिक प्रेक्षकांना प्रादेशिक भाषेत भारताच्या सर्वात आवडत्या कॉमेडी शोचा स्वाद देण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. गोकुळधामची दुनियादारी सोमवारी ते शनिवार दररोज रात्री ९ वाजता फक्त मराठी या वाहिनीवर प्रसारित केला जाईल.
“मराठीत आमच्या कार्यक्रमाची सुरूवात झाल्याबद्दल आम्हाला आनंद झाला. फक्त मराठी ही महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय प्रादेशिक टीव्ही वाहिन्यांपैकी एक आहे. याआधी, तारक मेहता का उल्टा चष्मा तेलगू भाषेत तारक मामा अय्यो रामा म्हणून प्रसारित केला गेला होता. दोन वर्षांत ६०० हून अधिक भागांचे प्रसारण करून त्या शोने चांगली कामगिरी केली. आम्हाला विश्वास आहे कि या प्रादेशिक स्वरूपाचे प्रेक्षकांकडून कौतुक होईल असे 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या कार्यक्रमाचे निर्माते आणि नीला फिल्म प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक असित कुमार मोदी म्हणतात.