Join us

'नक्कीच साखरपुडा अथवा लग्न…', प्राजक्ता माळीची 'ती' पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 15:24 IST

Prajakta Mali : 'जुळूनी येती रेशीमगाठी' या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री प्राजक्ता माळीची लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहे.

'जुळूनी येती रेशीमगाठी' या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सातत्याने चर्चेत येत असते. प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते. दिवसेंदिवस तिच्या फॅन फॉलोव्हिंगमध्ये वाढ होताना दिसते आहे. बऱ्याचदा तिची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत येताना दिसते. दरम्यान आता तिची लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहे. 

प्राजक्ता माळीने बुधवारी एक पोस्ट सोशल मी़डियावर शेअर केली होती ज्यात तिने म्हटले होते की, मोठ्या घोषणेसाठी तयार राहा. उद्या लाँच करणार आहोत. त्या आधीच्या पोस्टमध्ये तिने लिहिले होते की, खूप उत्सूकता, धाकधूक, आनंद…सगळचं.. एकत्र…गुपित उघडणार…..६ जानेवारीला. ५ वाजता. इंस्टा लाइव्हवर भेटू.

त्यानंतर आज तिने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिने चाहत्यांना ६ जानेवारीला काय लाँच करणार आहे, याची हिंट दिली आहे. तिने पायातील पैजण फ्लॉन्ट करणारा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, हिंट…नक्कीच साखरपुडा अथवा लग्न नाही.. त्यासाठी “वाट बघा”…भेटूया उद्या ५.३० वाजता - इंस्टा लाइव्हवर नक्की या.

प्राजक्ता माळी लवकरच नवीन इनिंगला सुरूवात करणार आहे. ती अभिनयाशिवाय नवीन बिझनेस सुरू करते आहे. ती पारंपारिक दागिन्यांचा बिझनेस करणार आहे. ज्याचे नाव आहे 'प्राजक्तराज'...मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते प्राजक्ताच्या या नवीन ब्रॅन्ड कलेक्शनचे उद्धाटन पार पडणार आहे.

टॅग्स :प्राजक्ता माळी