Join us

संजय मिश्रासाठी "मालिका 'ऑफिस ऑफिस' चित्रपटसृष्‍टीमध्‍ये प्रवेश करण्‍यापूर्वी उत्तम तालीम ठरली"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 6:38 PM

संजय मिश्रा म्हणाला ऑफिस-ऑफिस या मालिकेमध्‍ये काम करण्‍याची संधी मिळाल्‍याचे आभार. यामुळेच मी आज क्षेत्रामध्‍ये यश गाठू शकलो आहे.

'ऑफिस ऑफिस' पुन्‍हा प्रसारित करत प्रेक्षकांना चांगलीच मनोरंजन पर्वणी दिली आहे. २००१ मध्‍ये प्रसारित करण्‍यात आलेल्‍या या मालिकेला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम व लोकप्रियता मिळाली होती. मालिकेमधील दमदार पात्रं आणि स्‍टार कलाकारांनी प्रत्‍येकाच्‍या मनावर छाप पाडली होती. मालिका 'ऑफिस ऑफिस' आठवडाभर सायंकाळी ६ वाजता व रात्री १०.३० वाजता प्रसारित केली जात आहे.   मालिकेमध्‍ये शुक्‍लाजीची विनोदी भूमिका साकारलेला संजय मिश्रा टेलिव्हिजनवर पुन्‍हा एकदा त्‍याची मालिका पाहण्‍यासाठी खूपच उत्‍सुक आहे. त्‍याने 'ऑफिस ऑफिस' मालिकेच्‍या शूटिंगच्‍या दिवसातील त्‍याच्‍या संस्‍मरणीय आठवणींबाबत सांगितले. तो म्‍हणाला, ''मालिका 'ऑफिस ऑफिस' पुन्‍हा एकदा टेलिव्हिजनवर योग्‍य वेळी प्रसारित केली जात असल्‍याचा मला खूप आनंद झाला आहे. मी 'ऑफिस ऑफिस' मालिकेपूर्वी मालिकांमध्‍ये अधिक काम केलेले नव्‍हते. या मालिकेमध्‍ये काम करण्‍याची संधी मिळाल्‍याचे आभार. यामुळेच मी आज क्षेत्रामध्‍ये यश गाठू शकलो आहे. 

'ऑफिस ऑफिस'मध्‍ये, विशेषत: पंकज कपूर सारख्‍या उत्‍कृष्‍ट कलाकारासोबत काम करण्‍याचा अनुभव अद्भुत होता. ही मालिका माझ्यासाठी चित्रपटसृष्‍टीमध्‍ये प्रवेश करण्‍यापूर्वी उत्तम तालीम ठरली.  ही मालिका पुन्‍हा एकदा पाहताना त्‍या सुंदर क्षणांची आठवण येते.'''ऑफिस ऑफिस'साठी शूटिंग करण्‍याच्‍या दिवसांना उजाळा देत संजय मिश्रा म्‍हणाला, ''पंकजजींचा अभिनयाप्रती अत्‍यंत वेगळा व अद्वितीय दृष्टिकोन होता. सुरूवातीला मी त्‍यांच्‍यासोबत काम करण्‍याबाबत काहीसा नर्व्‍हस होतो, कारण ते काहीसे कडक होते. सुरूवातीच्‍या काही दिवसांमध्‍ये प्रत्‍येकवेळी मी संवाद म्‍हटल्‍यानंतर वळायचो आणि पंकज यांच्याकडे पाहून नर्व्‍हस होऊन जायचो. पण कालांतराने आमची त्‍यांच्‍याशी चांगली ओळख झाल्‍यानंतर आम्‍ही त्‍यांच्‍यासोबत साहचर्याने वागू लागलो. आणि स्थितीमध्‍ये चांगलाच बदल झाला. देवेन भोजानी, हेमंत पांडे, मनोज पाहवा, आसावरी जोशी व इतरांसह सर्व कलाकार खूपच उत्‍साही होते. मला प्रत्‍येकाकडून भरपूर शिकायला मिळाले. संपूर्ण टीम एकत्र तालीम करायची आणि आम्‍ही एकाच टेकमध्‍ये ३ पानांच्‍या सीनचे शूटिंग करायचो. माझ्यासाठी तो बरेच काही शिकण्‍याचा अनुभव होता.''

 शूटिंगच्‍या दिवसांमधील आवडत्‍या क्षणांबाबत विचारले असता संजय मिश्रा म्‍हणाला, ''शुक्‍लाजी पान थुंकण्‍याचा अत्‍यंत संस्‍मरणीय क्षण आहे. मला त्‍या भूमिकेसाठी खूप पान खावे लागले होते. याव्‍यतिरिक्‍त आम्‍ही सेटवर लंच टाइमची आतुरतेने वाट पाहायचो. आमचे दिग्‍दर्शक राजीव मेहरा यांच्‍यासह प्रत्‍येकजण त्‍यांच्‍या घरामधून जेवण घेऊन यायचे. आम्‍ही सर्वजण एकमेकांच्‍या भोजनांची चव घेण्‍यासाठी उत्‍सुक असायचो.''