Join us

Ohhअंगात 104 डिग्री ताप असूनही करावा लागला नीती टेलरला या भागाचे शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2017 5:20 AM

कलाकाराला परिस्थिती कितीह बिकट असो तरी शो मस्ट गो ऑनप्रमाणे त्याला इतर गोष्टींच्या तुलनेत त्याला त्याच्या कामाला अधिक प्राधान्य ...

कलाकाराला परिस्थिती कितीह बिकट असो तरी शो मस्ट गो ऑनप्रमाणे त्याला इतर गोष्टींच्या तुलनेत त्याला त्याच्या कामाला अधिक प्राधान्य द्यावे लागते. थंडी असो की ऊन, पाऊस असो की बर्फ, मालिकेत भूमिका करणा-या कलाकारांना वर्षाचे बाराही महिने ठरल्याप्रमाणे चित्रीकरणासाठी हजर राहावेच लागते. ‘लाईफ ओके’वरील ‘गुलाम’ मालिकेत भूमिका साकारणार्‍या नीती टेलरलाही याचा अनुभव अलीकडेच आला. तिचे अंग तब्बल 104 डिग्री तापाने फणफणत असले, तरी तिला चित्रीकरणासाठी उपस्थित राहावेच लागले. पण दुर्दैव इतक्यावरच थांबले नाही, कारण त्या दिवशीच्या चित्रीकरणानुसार तिला थंड पाण्याने आंघोळ घालण्याचा प्रसंग साकार करावयाचा होता! सेटवरील एका सूत्राने या घटनेची माहिती देताना सांगितले, “अंगात खूप ताप असतानाही नीती गेले काही दिवस शूटिंग  करीत आहे. त्या दिवशी दुर्दैवाने तिला शुध्दिकरणाचा प्रसंग साकारावयाचा होता, ज्यात तिची सासरची मंडली तिच्यावर 21 मडक्यांमधून थंड पाणी ओततात. या प्रसंगात नीती पाण्याने निथळत होती आणि शूटिंगदरम्यान तापामुळे कुडकुडत होती.”या प्रसंगाबाबत नीतीकडे विचारणा केली असता तिने सांगितले, “गेल्या काही दिवसांपासून मला ताप येतोय.104 डिग्री ताप होता. मी एक दिवस सुट्टी  घेण्याच्या विचारात होते, तेव्हा मला समजलं की  पुढच्या भागाच्या शूटिंगसाठी उपस्थित राहावंच लागेल.माझ्याशिवाय त्या भागाच शूटिंग होणार नव्हते.हे समजून मला बरे नसल्याचे गोष्ट मी कोणालाचा सांगितली नाही.त्यावेळी फक्त फक्त त्या भागाच्या शूटिंगचाच विचार डोक्यात सूरू होता. त्यानुसार सेटवर मला पटकथा मिळाली, शूटिंग दरम्यान मला कळाले की आज माझ्या अंगावर थंड पाणी टाकणार आहेत. यामुळे माझी तब्येत अधिकच बिघडली असती, पण एक अभिनेत्री म्हणून मला दुसरा पर्यायच उपलब्ध नव्हता. कथानकाच्या दृष्टीने हा प्रसंग विशेष महत्त्वाचा होता.”नीतीने अंगात ताप असतानाही थंड पाण्याने भिजवून घेण्याच्याप्रसंगाचे केवळ शूटिंग  केले असे नव्हे,तर हा प्रसंग अचूकतेने उभा राहावा, यासाठी त्याचा रिटेक घेण्याचीही सूचना केल्यात.