OMG! बिग बॉस फेम मंदना करिमीने केवळ एका महिन्यात पुन्हा केले लग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2017 5:28 AM
बिग बॉस फेम मंदना करिमीने केवळ एका महिन्यात पुन्हा केले लग्न हे वाचल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल. कारण ...
बिग बॉस फेम मंदना करिमीने केवळ एका महिन्यात पुन्हा केले लग्न हे वाचल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल. कारण मंदनाच्या लग्नाची बातमी गेल्याच महिन्यात आली होती. त्यामुळे केवळ एका महिन्यात तिने आता पुन्हा कोणाशी लग्न केले हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. पण मंदनाने दुसऱ्या कोणाशी नव्हे तर पुन्हा गौरव गुप्तासोबतच लग्न केले आहे.बिग बॉस फेम मंदना करिमीने तिचा प्रियकर गौरव गुप्ता यासोबत जानेवारीत विवाह केला होता. पण तिने हा विवाह अतिशय साध्या पद्धतीने कोर्टात केला होता, त्यामुळे तिने नुकतेच पुन्हा एकदा हिंदू रितिरिवाजानुसार गौरवशी लग्न केले. तिने कोर्ट मॅरेज केल्याची बातमी स्वतः इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवरून तिने दिली होती. तिने लग्नासोबतच संगीत, मेहंदी सगळेच कार्यक्रम अतिशय धुमधडाक्यात सेलिब्रेट केले. तिने संगीत आणि मेहेंदीचे फोटो सोशल नेटवर्किंगवर पोस्ट केले आहेत. बिग बॉस या कार्यक्रमामुळे मंदना नावारूपाला आली होती. या कार्यक्रमानंतरच काही दिवसांत तिची आणि गौरवची भेट झाली आणि ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्या दोघांना अनेकवेळा पार्टींमध्ये एकत्र पाहिले जात होते. तसेच मंदना तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरदेखील गौरवसोबतचे फोटो नेहमीच पोस्ट करत असते. डिसेंबरमध्ये त्यांनी त्यांच्या नात्याला पुढे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आणि जानेवारीत अतिशय साध्या पद्धतीने कोर्टात विवाह केला.मंदनाचा हा दुसरा विवाह असून तिने याआधी ललिता तेहलान याच्याशी लग्न गेले होते. मात्र लग्नानंतर तो गे असल्याचे तिला कळले आणि काहीच दिवसांत तिने त्याला घटस्फोट दिला. ललित आणि फॅशन डिझायनर रोहित बल यांच्यात अफेअर असल्याने मंदनाने ललितला सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जाते.