Join us

OMG...! या अभिनेत्रीचा बाथरूम डान्स सोशल मीडियावर होतोय व्हायरल, पहा तिचा हा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 15:22 IST

छोट्या पडद्यावरील डान्स रिएलिटी शो नच बलियेचा नवव्या सीझनच्या या स्पर्धकाचा बाथरूम डान्स होतोय व्हायरल

छोट्या पडद्यावरील डान्स रिएलिटी शो नच बलियेचा नवव्या सीझनची स्पर्धक श्रद्धा आर्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत ओ साकी साकी गाण्यावर ती थिरकताना दिसतेय. 

श्रद्धा आर्या तिचा बॉयफ्रेंड आलम मक्करसोबत नच बलिएमध्ये सहभागी झाली आहे. श्रद्धाने नुकताच एक सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ती तिच्या फ्रेंडसोबत नोरा फतेहीवर चित्रीत झालेलं ओ साकी साकी या गाण्यावर थिरकताना दिसते आहे. तिने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून लिहिले की, हे घरी ट्राय करू नका. 

श्रद्धा आर्याचा १७ ऑगस्टला वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.

 

श्रद्धा आर्या व आलम मक्करने नच बलिए ९च्या सेटवर आपल्या डान्सनं सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. तसेच त्यांचे परफॉर्मन्स परिक्षकांसोबत प्रेक्षकांनाही भावतो आहे.

नच बलिये शोच्या सुरूवातीला असे वृत्त आले होते की श्रद्धा आर्या या गोष्टीमुळे नाराज होती की तिच्यापेक्षा अनिता हंसनंदानीला जास्त मानधन मिळत आहे. या कारणामुळे ती शो सोडणार होती. मात्र नंतर ही अफवा ठरली.

टॅग्स :नच बलियेस्टार प्लस