Join us

'हा दिवा आता कधीच विझणार नाही...'; पॅडीची कविता ऐकून DP आणि अंकिताचे डोळे पाणावले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 6:03 PM

पंढरीनाथ अर्थात पॅडी कांबळेने सादर केलेली कविता ऐकून धनंजय पोवार आणि अंकिताचे डोळे पाणावले (bigg boss marathi 5)

बिग बॉस मराठीच्या घरात सतत भांडण, रुसवेफुगवे बघायला मिळतात. पण कधीकधी बिग बॉसच्या घरात हलकंफुलकंं वातावरणही बघायला मिळतं. बिग बॉस मराठीच्या घरात असाच एक हृदयस्पर्शी प्रसंग घडलाय. एरवी घरात एकमेकांविरुद्धध कटकारस्थान करणारे बिग बॉस मराठीमधील सदस्य पॅडी कांबळेची कविता ऐकून भावुक झालेले दिसले. अरबाज, अंकिता, धनंजय, सूरज सर्वचजण ही कविता ऐकून भावुक झालेले दिसले.

ही आहे पॅडी कांबळेची कविता

पॅडी कांबळेने कविता म्हणायला घेतली. पॅडीने म्हटलेली कविता पुढीलप्रमाणे, तुला सांगायचं असलं तरच सांग, मी आपलं सहज एक आठवण म्हणून सांगतोतुला आठवतं आपण समुद्रावर जायचो, दूरवरच्या नावेचं तुझ्या डोळ्यात स्वप्न तयार व्हायचंआजही तू समुद्रावर जात असशील. दूरवरच्या नावेचं तुझ्या डोळ्यात स्वप्न तयार होत असेलअगं पण त्याच्या सिगरेटच्या धुराने ते विस्कटून तर जात नाही ना?नाही म्हणजे, तुला सांगावंसं वाटलं तरच सांग.. मी आपलं सहज एक आठवण म्हणून सांगतोतुला आठवतं आपण देवळात जायचो, गाभाऱ्यात डोळे मिटून असायचीस तासन् तास. मी अख्खं शहर फिरुन यायचो.आजही तू देवळात जात असशील, गाभाऱ्यात बसत असशील डोळे मिटून तासनतास.अगं पण.. तुझ्या डोळ्यांना अजूनही माझेच वेध लागलेले असतात का?नाही म्हणजे, तुला सांगावंसं वाटलं तरच सांग, मी आपलं सहज एक आठवण म्हणून सांगतोतुला आठवतं त्यादिवशी चंद्र लाजला होता, त्याला पाहण्याच्या नादात दिवाही विझला होताआजही तो चंद्र लाजताना दिसत असेल, तुझी रात्र दिवा मालवण्यात जात असेलनाही गं... आता तुला सांगावंसं वाटलं तरीही सांगू नकोसआता मीच तुला सांगतो... या दिव्याने त्या चंद्राशी संगनमत केलंय आणि त्याला वचन दिलंयहा दिवा आता कधीच विझणार नाही.. हा दिवा आता कधीच विझणार नाही

अशाप्रकारे पॅडी कांबळेने म्हटलेली ही कविता ऐकून सर्वांचेच डोळे पाणावले. एरवी घरात आरडाओरड करुन आकांडतांडव करणारा अरबाज सुद्धा शांतपणे ऐकत होता. इतकंच नव्हे तर अंकिता वालावलकर, धनंजय पोवार यांचे डोळे पाणावलेले दिसले.

टॅग्स :बिग बॉस मराठीभात