जम्मू काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. तर काही पर्यटक जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी पर्यटकांचं नाव, धर्म विचारून त्यांना गोळ्या झाडल्याचं समोर आल्याने देशभरातून संताप व्यक्त होत आहे. सेलिब्रिटी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत आहेत. मराठी अभिनेता समीर परांजपेने यावर भली मोठी पोस्ट लिहित पहलगाम व्हॅलीचं नाव हिंदू व्हॅली करण्याचा सल्ला सरकारला दिला आहे.
काय म्हणाला समीर परांजपे?
बास झालं.. बास झालं..झालं त्यानंतर संताप राग चिड द्वेष हे सगळं आहेच पण आता पावलं उचलणार म्हणजे काय करणार? कंठस्नान वैगरे घालाल तुम्ही यात शंका नाही पण ही कीड संपवायला कायमची आणि ठाम पावलं उचलायची असतील तर भारताचा एक नागरिक म्हणून मला वाटतं ...१) भारताची उपराजधानी / उन्हाळी राजधानी श्रीनगर घोषित करा.
२) मार्च ते मे असे वर्षातले ३ महिने गृहमंत्र्यांच्या ऑफिसचा कारभार काश्मीर मधून चालावा. कारण एवढंच की नुसत काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे हे भाषणात बोलून चालणार नाही ते दाखवून ही दिलं पाहिजे.
३) दर वर्षी संसदेच एक सत्र कायम काश्मीर मध्ये व्हावं.
४) राष्ट्रपती भवन काश्मीरला हलवण्यात यावं.
५) स्थानिक असंतोषाच्या आईचा भोस@# . आता सरकार ठरवेल त्याच आणि इतर राज्यात जशा ओपन पद्धतीने गोष्टी होतात तश्याच गोष्टी इथे होणार ज्यांना आक्षेप आहे त्यांनी उपाशी मरा. देशात अनेक गोष्टी दाबल्या जातात ह्या छोट्या मोठ्या असंतोषाच्या सुद्धा दाबून टाका.
६) ज्या व्हॅली मध्ये हे घडलं त्या पहलगाम व्हॅली चे नाव हिंदू व्हॅली असं करण्यात यावं. ही मागणी एवढ्याच साठी की जे झालं ते पिढ्यान् पिढ्या आंधळ्या हिंदू जनतेला कळत रहावं.
७) मोठ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजन काश्मीरमध्ये करावं अनायसे गृहमंत्र्यांचे सुपुत्र आयसीसी चेअरमन आहेत त्यामुळे हे होऊच शकतं. तसं इन्फ्रा नसेल तर उभं करा.
८) RSSने दसरा संचलन दर २ वर्षांनी नागपूरऐवजी काश्मीरमध्ये करावं.
९) या प्रसंगानंतर पर्यटक रोडवण्याची शक्यता आहे ते होऊ नये यासाठी पर्यटन महोत्सवाच आयोजन करा. देशातले झाडून सगळे VIP जे ३ दिवस अंबानींच्या लग्नात पैसे घेऊन घरचं लग्न असल्यासारखे नाचले होते ते सगळे उत्तम पैसे देऊन आणि त्यांच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी घेऊन या महोत्सवासाठी काश्मीरमध्ये आणा राज्याचे आणि देशाचे ॲम्बेसेडर म्हणून. सोबत सर्व इस्लामी देशांचे राष्ट्रपती पंतप्रधान यांना पाहुणे म्हणून आमंत्रित करा.
१०) आर्मी चीफ यांचे ऑफिसचा कारभारदेखील काही महिने काश्मीर मधून चालावा.
तसंही भरमसाठ कर देतोच आहोत आम्ही पण ह्या सगळ्यासाठी जो काही तिजोरीवर खर्च येईल तो आमच्यावर कर रूपाने टाकलात तरी आमची हरकत नाही पण हे एवढं कराच. हे सगळं किंवा यातलं काही टक्के जरी झालं तर RDX आणि हत्यारे वैगरे सोडा, साधी टाचणी सुद्धा या राज्यात पोहचू शकत नाही याची मला देशाचा नागरिक म्हणून खात्री आहे.जय हिंद. जय हिंदू
जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण आहेत. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर कायदेशीर स्ट्राइक केलं आहे. भारताने अटारी चेकपोस्ट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच पाकिस्तानात असलेल्या भारतीयांना १ मे पर्यंत परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर भारतातील पाकिस्तानी नागरिकांना पुढच्या ४८ तासांत देश सोडून जाण्यास सांगितले आहे. भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.