Join us

"हिंदू धर्म स्वीकार", रमजानमध्ये कपाळावर टिकली लावल्याने पाकिस्तानी अभिनेत्री होतेय ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 17:02 IST

कपाळावर टिकली लावल्याने पाकिस्तानी अभिनेत्रीला ट्रोल केलं जात आहे. ही अभिनेत्री म्हणजे लोकप्रिय असलेली हनिया आमिर आहे.

कपाळावर टिकली लावल्याने पाकिस्तानी अभिनेत्रीला ट्रोल केलं जात आहे. ही अभिनेत्री म्हणजे लोकप्रिय असलेली हनिया आमिर आहे. हनियाचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. भारतातही तिचं फॅन फॉलोविंग आहे. ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. हनियाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन काही फोटो शेअर करत भारतीय चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र यामध्ये तिने टिकली लावल्याने काही चाहते भडकले. 

हनिया सध्या युकेमध्ये आहे. तिथले काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. या  शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने कपाळावर लाल टिकली लावल्याचं दिसत आहे. "एका तत्त्वज्ञानी व्यक्तीने सांगितलं होतं की कुणीही वाईट ऐकू नये. त्यामुळेच मी वाईट बोलत नाही. होळी साजरी करणाऱ्या सगळ्यांना हॅपी होली", असं कॅप्शन तिने दिलं होतं. मात्र, तिच्या चाहत्यांना अभिनेत्रीने टिकली लावणं आणि रमजानमध्ये होळीच्या शुभेच्छा देणं रुचलेलं नाही. तिच्या या फोटोंवर कमेंट करक तिला ट्रोल केलं आहे. 

"प्रसिद्धीसाठी काहीही", "रमजानमध्ये हे सगळं?", "तू हिंदू धर्माचा स्वीकार कर. बॉलिवूडमध्येही काम मिळेल", "बॉलिवूडमध्ये जाण्यासाठी हे सगळं करत आहे" अशा अनेक कमेंट हानियाच्या पोस्टवर आहेत.  दरम्यान हानियाने 'दिसरुबा', 'तितली', 'इश्किया', 'संग-ए-माह' या गाजलेल्या पाकिस्तानी मालिकांमध्ये काम केलं आहे. 'मेरे हमसफर' या मालिकेतील हला या भूमिकेने तिला भारतात लोकप्रियता मिळवून दिली. 

टॅग्स :टिव्ही कलाकारसेलिब्रिटी