Join us

"तुमच्या आडनावामुळे मला वाटतं की.."; पाकिस्तानी फॅनचा शिवाजी साटम यांना मेसेज, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 16:24 IST

एका पाकिस्तानी चाहत्याने CID फेम शिवाजी साटम यांना केलेल्या मेसेजची चांगलीच चर्चा आहे. जाणून घ्या (shivaji satam)

सध्या मनोरंजन विश्वात एका गोष्टीची चांगलीच चर्चा आहे ती म्हणजे CID 2 मालिकेतून झालेली शिवाजी साटम यांची एक्झिट. या मालिकेत ACP प्रद्युम्नचा मृत्यू दाखवल्यामुळे चाहत्यांना चांगला धक्का बसला. अनेकजण यामुळे CID 2 मालिकेवर टीका करत आहेत. याशिवाय एसीपी प्रद्युम्न मालिकेत पुन्हा दिसावे, म्हणून चाहते मागणी करत आहेत. अशातच मालिकेत एसीपी प्रद्यम्न यांच्या भूमिकेत दिसलेल्या शिवाजी साटम यांना थेट पाकिस्तानातून एका चाहत्याचा मेसेज आलाय. काय म्हणाला चाहता?

थेट पाकिस्तानातून शिवाजी साटम यांना आला मेसेज

सीआयडी सीझन २ मध्ये एसीपी प्रद्यम्न यांचा मृत्यू होतो हा एपिसोड बघताच पाकिस्तानी चाहता शिवाजी साटम यांना म्हणतो की, "नमस्कार, मला आशा आहे की हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहचेल. शिवाजी साटम यांच्यासोबत (एसीपी सर) तुमचं काय नातं आहे हे मला माहित नाही. पण तुमच्या आडनावामुळे, मला वाटते की तुमचे एसीपी सरांशी काहीतरी नाते आहे. कृपया तुम्ही माझा संदेश एसीपी सरांना पोहोचवू शकाल का?"

"माझे आजोबा ७५ वर्षांचे आहेत आणि आज बऱ्याच वर्षांनी आम्ही डिश टीव्ही वापरून पाकिस्तानमध्ये टीव्हीवर पुन्हा सीआयडी २ पाहत होतो. परंतु आजचा भाग पाहताना आम्हा सर्वांना धक्का बसला. हा प्रसंग खरोखरच हृदयस्पर्शी आहे. पाकिस्तानमध्येही लोक त्यांना एसीपी सर म्हणून ओळखतात. एसीपी सर म्हणजेच शिवाजी साटम सर असतील, हे एक चाहता म्हणून आम्हाला माहितीय."

"एसीपी सर आम्हाला आवडतात. यागचं कारण आम्हाला माहित नाही पण आम्ही त्यांच्यावर खूप प्रेम करतो. पाकिस्तानी चाहत्यांच्या वतीने, मी तुम्हाला सांगू इच्छितो की एसीपी सर बेस्ट आहेत आणि पाकिस्तानमध्येही लोक त्यांना प्रेम करतात." अशाप्रकारे शिवाजी साटम यांची CID 2 मालिकेतून एक्झिट झाल्यावर जगाच्या कानाकोपऱ्यातून त्यांना मेसेज येत आहेत.

टॅग्स :शिवाजी साटमसीआयडीटेलिव्हिजनबॉलिवूडपाकिस्तान