Join us

हनीमूनविषयी प्रश्न विचारताच संतापली प्रसिद्ध गायिका; लाइव्ह कार्यक्रमात को-होस्टला केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 13:12 IST

Shazia manzoor: शाजिया यांचा संताप पाहता सेटवर सगळेच मध्यस्थी करायला पुढे गेले. मात्र, त्या कोणाचंही ऐकायच्या मनस्थितीत नव्हत्या.

सोशल मीडियावर सध्या एका प्रसिद्ध पाकिस्तानी गायिकेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ही गायिका प्रसिद्ध कॉमेडियन शेरी नन्न्हा यांना मारहाण करताना दिसत आहे. विशेष म्हणजे शेरी यांनी केलेली पर्सनल कमेंट या गायिकेला न पटल्यामुळे तिने थेट लाइव्ह कार्यक्रमात कॉमेडियनवर हात उचलला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडीओ गायिका शाजिया मंजूर यांचा आहे. अलिकडेच त्या एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. यावेळी शेरी यांनी त्यांना हनिमून संदर्भात एक प्रश्न विचारला. हा प्रश्न ऐकताच त्या संतापल्या आणि त्यांनी सरळ उठून शेरीला मारहाण करायला सुरुवात केली. विशेष म्हणजे हे प्रकरण इतकी चिघळलं की कार्यक्रमाचे होस्ट मोहसिन अब्बास हैदर यांना मध्यस्थी करावी लागली. 

नेमकं काय झालं?

लाइव्ह शो सुरु असताना शेरीने शाजिया यांना हनिमून संदर्भात एक प्रश्न विचारला.यापूर्वीही त्याने सेम प्रश्न त्यांना विचारला होता. ज्यामुळे त्या संतापल्या ".तू एक थर्ड क्लास माणूस आहेस हे यावरुन सिद्ध होतंय. मागच्यावेळी पण मी सांगितलं होतं की हा हनीमूनवरुनच बोलतो. पण, सगळ्यांना वाटलं हा प्रँक आहे. लाज वाटत नाही तुला?", असं म्हणत शाजियाने शेरीला भराभर कानशिलात लगावण्यास सुरुवात केली.

पुढे त्या म्हणतात, "एका स्त्रीसोबत हनीमूनसारख्या गोष्टींवर चर्चा करायला तुला लाज वाटत नाही का? मागच्यावेळीही प्रँक म्हणत तू याच मुद्द्यावर चर्चा करत होतास. त्यामुळे आता मी जे काही केलंय ते योग्यच आहे."

दरम्यान, शाजियाचा चढलेला पारा पाहून हैदर यांनी मध्यस्थी करण्यास सुरुवात केली. 'शेरी जे स्क्रिप्टमध्ये दिलंय तेच बोल ना. कशाला उगाच मनाची वाक्य बोलतोस', असं म्हणत हैदरने हे प्रकरण शांत करायचा प्रयत्न केला. मात्र, शाजिया कोणाचं ऐकायला तयार नव्हत्या. त्यांनी शेरीला बरीच मारहाण केली. इतकच नाही तर शाजियाने रागाच्या भरात हा शो अर्ध्यावर सोडून स्टुडिओच्या बाहेर गेली.

कोण आहे शाजिया मंजूर?

शाजिया पाकिस्तानची प्रसिद्ध गायिका आहे. त्यांनी अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांसाठी गाणी गायली आहेत. त्यांची 'बतियां बुझाई रख दी', 'चान मेरे मखना' आणि 'बल्ले बल्लाय' ही गाणी सुपरहिट झाली आहेत.

टॅग्स :सेलिब्रिटीपाकिस्तान