बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनची चांगलीच चर्चा आहे. या सीझनमध्ये पहिल्या तीन दिवसातच तुफान राडा झालेला पाहायला मिळतोय. हळूहळू बिग बॉस देत असलेल्या टास्क आणि इतर ट्विस्टमुळे घरातलं वातावरण चांगलंच तापलंय. अशातच काल तीन दिवस शांतपणे खेळ खेळणाऱ्या पॅडी कांबळेला बिग बॉसने काल सर्वांसमोर चांगलंच सुनावलंय. पॅडीला सर्वांसमोर बिग बॉसचा ओरडा ऐकावा लागला. असं काय घडलं
निक्कीचं कौतुक करणं पॅडीला महागात पडलं अन्...
काल बिग बॉसच्या नवीन सीझनमध्ये निक्कीने सर्वांच्या नाकीनऊ आणले. निक्कीने अंकिताला गेममध्ये पुढे जाऊ दिलं नाही. तिच्या मागेमागे राहून तिला अडवून धरलं होतं. त्यामुळे अंकिताच्या डोळ्यात पाणी आलेलं दिसलं. पुढे अंकिता खेळात आल्यावर निक्की - अंकिता दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. नंतरही अंकिता भावुक झालेली दिसली. पॅडी कांबळे नंतर निकीताजवळ आला. तो म्हणाला, "मला काही गोष्टी पटत नाहीत पण गेम प्लॅन म्हणून ठीक आहे." असं म्हणत पॅडीने निक्कीची पाठ थोपटली.
बिग बॉसने सर्वांसमोर पॅडीला सुनावलं
निक्कीचं कौतुक केल्यानंतर बिग बॉसने पंढरीनाथ कांबळेचं नाव पुकारलं. बिग बॉस म्हणाले, "इतरांचंच कौतुक करत राहणार आहात की आपलाही काही गेम प्लॅन आहे." पंढरीनाथ मान डोलावत "आहे" असं सांगतो. पुढे बिग बॉस "सहजच विचारलं" असं पंढरीनाथला सांगतात. यावर निक्की "बाssई" असं म्हणते. पंढरीनाथ हसून तिथून निघून जातात. अशाप्रकारे निक्कीचं कौतुक केल्याने पंढरीनाथची बिग बॉसने सर्वांसमोर शाळा घेतलेली दिसली.