Join us

सूरजसाठी कायपण! घराबाहेर पडताना पॅडी म्हणाला, "मी त्याचं पालकत्व ...."; दोघांचेही डोळे पाणावले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 10:24 AM

काल बिग बॉस मराठीच्या घरातून पॅडी कांबळे घराबाहेर गेला. जाताना पॅडी सूरजसाठी थोडक्यात पण महत्वाचं वाक्य बोलला (suraj chavan, bigg boss marathi 5)

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनची सध्या चांगलीच चर्चा आहे. काल बिग बॉस मराठीमधून पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे घराबाहेर पडलाय. पॅडी कांबळे घराबाहेर गेल्याने सर्वांनाच धक्का बसला. बिग बॉसच्या घरातील इतरांचे चेहरेही भावुक झालेले दिसले. जाता जाता पॅडीला त्याच्या इन्व्हेस्टमेंट बॉक्ससाठी घरातील एका सदस्याला नॉमिनी करायचं होतं. तेव्हा पॅडीने सूरज चव्हाणचं नाव घेतलं. याशिवाय जाता जाता पॅडी सूरजसाठी थोडक्यात पण महत्वाचं वाक्य बोलले.

पॅडीने जाता जाता सर्वांच्या डोळ्यात पाणी आणलं 

डॉ.निलेश साबळेने काल पॅडीला इन्व्हेस्टमेंट बॉक्ससाठी कोणाला नॉमिनी करायला आवडेल विचारताच पॅडीने सूरजचं नाव घेतलं. त्यानंतर पॅडी सूरजला म्हणाला की, "सूरज चव्हाण जो माझ्या सगळ्या गोष्टींचा नॉमिनी असेल. त्याने नॉमिनी न करता मी त्याचं पालकत्व आयुष्यभरासाठी घेतलंय." असं महत्वाचं वाक्य पॅडी सूरजसाठी म्हणाला. पुढे घरात आल्यावर पॅडी आणि सूरजने एकमेकांना मिठी मारली. दोघांच्या डोळ्यात पाणी नसलं तरीही ते एकमेकांसाठी भावुक झालेले दिसले.

फिनालेआधीच पॅडी कांबळे घराबाहेर

गेल्या आठवड्यात पॅडी कांबळेसोबत घरात अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर, वर्षा उसगांवकर असे आठ जण नॉमिनेट होते. त्यापैकी पॅडी कांबळेचा घरातील प्रवास संपला . पॅडीच्या नावाची घोषणा होताच अंकिताला अश्रू अनावर झाले. याशिवाय पॅडीच्या ग्रुपमधील सर्वच सदस्य म्हणजेच धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत भावुक झालेले दिसले. सूरज आणि पॅडीचं मैत्रीपूर्ण नातं आपण पाहिलं. त्यामुळे या आठवड्यात सूरजला पॅडीची कमी नक्कीच जाणवेल यात काही शंका नाही.

 

 

टॅग्स :बिग बॉस मराठीटेलिव्हिजन