'बिग बॉस मराठी' सीझन २ मधील स्पर्धक पराग कान्हेरे वेगवेगळ्या कारंणामुळे चर्चेत राहिली.एका टास्क दरम्यान परागने नेहाच्या कानाखाली मारली आणि माधव देवचक्के, वैशाली माडे व अभिजीत केळकर यांच्यासोबतही त्याची मारामारी झाली. त्यामुळे त्याला बिग बॉसच्या घरातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यानंतर पराग पुन्हा घरात परतणार अशी चर्चा रंगली होती.
परागनेही त्याच्या सोशल मीडियावरुन मी येणार अशी पोस्ट टाकून उत्सुकता आणखी वाढवली होती. मात्र पराग बिग बॉसच्या घरात परत येत नसून तो 'कूक विथ पराग कान्हेरे' नावाची किचन सिरीज घेऊन आपल्या भेटीला येतो आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन परागने ही माहिती दिली. परागने लिहीले आहे की, मी येणार... सगळ्यांबद्दल बोलणार... असं काही दिवसांपूर्वी मी पोस्ट केलं आणि त्याचा सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने अर्थ लावला... असो... मी येणार म्हणता म्हणता तो दिवस येऊन ठेपलाय... मी येतोय माझ्या किचनसूत्रा या चॅनेलवर एक अनोखी सिरीज घेऊन...