Join us

'माझी तुझी रेशीमगाठ' संकर्षणनंतर शेवटचा सीन शूट करताना मायरा झाली भावूक, म्हणाली- 'परी' म्हणून...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2022 1:59 PM

लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. लाडक्या परीची भूमिका साकारणाऱ्या मायरा वायकुळनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर नवीन मालिका दाखल होताना दिसत आहेत. त्यामुळे जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. अशातच लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Mazhi Tuzhi Reshimgaath ) हा प्रेक्षकांची आवडती मालिका देखील प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. यश व नेहाच्या प्रेमाची कथा सांगणारी ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

या मालिकेतील परीची भूमिका साकारणारी मायरा वायकुळनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत पोस्ट लिहिली आहे. यामध्ये तिने परीचा मालिकेतील शेवटचा सीन शूट झाल्याचं प्रेक्षकांना सांगितलं. मायरा लिहिते, माझी तुझी रेशीमगाठी मालिकेचा ' परी ' म्हणून हा पहिला सीन शूट केलेला दिवस अजूनही काल घडल्यासारखाच वाटतोय आणि पाहता पाहता आज मालिकेचा शेवटचा सीन शूट करण्याची वेळ आज येऊन ठेपली सुद्धा... खुप भावूक झालेय या क्षणाला... पण म्हणता म्हणता मधले एक वर्ष कसे सरले ते कळलेच नाही; याचे कारण म्हणजे तुम्ही सर्व रसिक प्रेक्षकांनी आणि मालिकेतील सर्व कलाकारांनी व संपुर्ण टीम ने ' परी ' ला आणि अर्थातच मला म्हणजेच मायरा वायकुळ ला दिलेले अफाट प्रेम!!...

परीला तर प्रेक्षक वर्गाच्या सर्वच स्तरांतून भरभरून प्रेम मिळाले त्याबद्दल मी सर्वच रसिक प्रेक्षकांचे कायम ऋणी राहीन. आणि ' परी ' ही गोड भूमिका मला साकारायची संधी दिल्याबद्दल MTR च्या संपूर्ण तुमचे व झी मराठी वाहिनी चे मन: पुर्वक आभार! तुम्हा सर्वांचे माझ्यावरील प्रेम- आशीर्वाद असेच कायम राहो व माझ्याकडुन यापुढे छान छान कलाकृती घडत राहो अशी बाप्पाचरणी मनोमन प्रार्थना तुमचीच लाडकी, परी अर्थात मायरा वायकुळ.

दरम्यान ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे नेहाची गोड मुलगी अर्थात परी. परीची भूमिका साकारणारी मायरा वायकुळने आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ च्या जागी ‘दार उघड बये’ ही नवी मालिका सुरू होणार आहे. ‘दार उघड बये’ ही मालिका येत्या 19 सप्टेंबरपासून सुरू होतेय.

टॅग्स :झी मराठीसेलिब्रिटी