खाण्यावरून परमित सेठी आणि फैजल रशिदमध्ये जमली गट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2017 05:04 AM2017-02-10T05:04:07+5:302017-02-10T10:34:07+5:30
परमित सेठीने दिलजले, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे यांसारख्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकरल्या आहेत. त्याने बदमाश कंपनी या चित्रपटाचे दिग्दर्शन ...
प मित सेठीने दिलजले, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे यांसारख्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकरल्या आहेत. त्याने बदमाश कंपनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्याने दिग्दर्शित केलेल्या पहिल्याच चित्रपटाचे अनेकांनी कौतुक केले होते. आता तो हर मर्द का दर्द या मालिकेचे दिग्दर्शन करत आहे. कोणत्याही मालिकेचे दिग्दर्शन करण्याची ही त्याची पहिलीच वेळ आहे.
परमित या मालिकेचा दिग्दर्शक असला तरी तो त्यांच्या कलाकारांसोबत एखाद्या मित्रासारखाच वागतो. या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारा फैजल आणि त्याची तर खूपच चांगली गट्टी जमली आहे. या मालिकेची टीम नुकतीच चित्रीकरणासाठी पटियाला येथे गेली होती. तिने तर त्यांनी चित्रीकरण करण्यासोबतच खूप मजा मस्ती केली. याबाबत परमित सांगतो, "आम्ही दोघेही खाण्याचे शौकिन आहोत. त्यावरून तर कुठे काय चांगले मिळते यावरून आमच्या अनेक तास गप्पा रंगतात. फैजलची पत्नी ही काश्मिरी आहे. मला काश्मिरी जेवण खूप आवडते. त्यामुळे मी सहजच एकदा त्याला बोललो होतो की, मला काश्मिरी जेवण खाण्याची इच्छा आहे. त्याने लगेचच ही गोष्ट त्याच्या पत्नीला सांगितली. त्यावेळी ती काश्मिरला एका कामानिमित्त गेली होती. तिने आल्यावर लगेचच अनेक प्रसिद्ध काश्मिरी पदार्थ माझ्या घरी पाठवून दिले. ते सगळेच पदार्थ खूप टेस्टी होते. तसेच पटियालाला चित्रीकरण सुरू असताना चित्रीकरण संपल्यावर फैजल रोज धावण्यासाठी जात असत. त्याला पाहून मी सुद्धा त्याच्यासोबत जायला लागलो. चित्रीकरण संपल्यावर आमचा हा दररोजचाच कार्यक्रम बनला होता. आम्ही रोज जातो हे पाहून जिनल आणि करणसुद्धा आमच्यासोबत येऊ लागले."