Join us

अरे देवा! ATM मधून फाटलेल्या नोटा, 'पारू' फेम अभिनेत्रीनं शेअर केला फोटो, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 10:51 AM

यावर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीनं संताप व्यक्त केला आहे. 

दैनंदिन जीवनात अनेक कामासाठी कॅशची गरज लागत असते. एटीएमद्वारे आपण रोख रक्कम काढीत असतो. पण, कधी-कधी तुम्ही जेव्हा एटीएममधून पैसे काढण्यासाठी जाता, त्यावेळेस अनेकदा फाटलेल्या नोटा मिळतात. यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतो. असाच एक प्रकार 'पारू' फेम अभिनेत्री मुग्धा कर्णिक हिच्यासोबत झाला आहे. अभिनेत्रीनं एटीएम (ATM) मधून पैसे काढताच तिला फाटलेल्या नोटा आल्या आहेत. यावर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीनं संताप व्यक्त केला आहे. 

मुग्धा कर्णिक हिनं इन्स्टाग्राम स्टोरीवर एटीएम (ATM) मधून पैसे काढल्यावर आलेल्या फाटलेल्या नोटांचा फोटो शेअर केला. कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, 'एका नामांकित बँकेच्या एटीएममधून आज अशाप्रकारच्या नोटा आल्या. याबद्दल त्यांच्याकडे तक्रार किंवा विचारणा करायची असल्याला तर, कस्टमर केअर नंबर सुद्धा सुरू नाही. आता ही समस्या मी कशी सोडवू? त्यांना फोन केल्यावर तक्रार निवारण करण्याचे विशिष्ट विभाग असतात. त्याच तुमची समस्या समाविष्ट नसेल तर पुढे काहीच होत नाही. #needtochangemybank (मला बँक बदलण्याची गरज आहे)', अशा शब्दात तिनं संताप व्यक्त केला. 

मुग्धा कर्णिक यांनी पारु मालिकेत काम करण्याआधी झिम्मा, स्वाभिमान, होम स्वीट होम या मालिका, नाटक तसेच चित्रपटातून अभिनेत्री म्हणून काम केलं आहे. आता अहिल्यादेवी किर्लोस्करांच्या भूमिकेतून त्यांनी विशेष छाप उमटवली आहे. करारी नजर, कठोर स्वभाव हे अहिल्यादेवींच वैशिष्ट्य आहे. अहिल्यादेवी किर्लोस्करांच पात्र मालिकेत जरी कठोर वाटत असलं, तरी प्रत्यक्ष जीवनात मात्र, सर्वांशी जुळवून घेण्याचा, मिळून-मिसळून राहण्याचा मुग्धा कर्णिकचा स्वभाव आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीमराठी अभिनेताएटीएम