Join us

पॅशन पैसा नव्हे तर समाधान देतो- विशाल सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 4:14 PM

विशाल आदित्य सिंह आपणास चंद्रगुप्त मौर्य, ससुराल सिमर का, टाइम मशिन, चंद्रकांता आदी शोजमध्ये दिसला आहे. आजपर्यंत विविधांगी भूमिका साकरल्यानंतर तो सध्या ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ मध्ये बघावयास मिळत आहे.

-रवींद्र मोरे 

प्रसिद्ध टीव्ही कलाकार विशाल आदित्य सिंह आपणास चंद्रगुप्त मौर्य, ससुराल सिमर का, टाइम मशिन, चंद्रकांता आदी शोजमध्ये दिसला आहे. आजपर्यंत विविधांगी भूमिका साकरल्यानंतर तो सध्या ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ मध्ये बघावयास मिळत आहे. यातील त्याच्या भूमिकेबद्दल तसेच त्याच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीबद्दल ‘सीएनएक्स’ने त्याच्याशी साधलेला संवाद...

* या शो मधील तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील?- यात मी तेवर नावाच्या एका रॅपरची भूमिका साकारत असून माझे भुतकाळातील रिलेशनशीप दाखविण्यात आले आहे. लव्हली नावाच्या मुलीवर मी अगोदर प्रेम करायचो, मात्र काही कारणास्तव आमचे लग्न होऊ शकले नव्हते. ते प्रेम मी अजूनही विसरु शकलो नाही, आणि याचा परिणाम सध्याच्या परिस्थितीवर कसा होतोय ते यात दाखविण्यात आले आहे. शिवाय यात मला महादेवाचा मोठा भक्तही दाखविण्यात आला आहे. 

* या शोचे वेगळेपण काय आहे?- खूपच सुंदर आणि मुद्देसुद कथा आहे. संपूर्ण परिवाराशी निगडित असे कथानक असून प्रत्येक नात्यासंबंधाची सखोलता यात दाखविण्यात आले आहे. शिवाय प्रेझेंटेशनही खूपच दमदार आहे, असे नाही की मी यात काम करतोय म्हणून सांगत आहे. जर मी यात नसतो तरीही हा शो मी आवर्जून पाहिला असता. विशेष म्हणजे सर्वांनी भूमिका अगदी नैसर्गिक वाटते. आतापर्यंत मी असा शो पाहिला नाही, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. 

* एखादी भूमिका निवडताना कोणत्या गोेष्टींना जास्त महत्त्व देतो?- मी भूमिका निवडताना सर्वप्रथम माझा रोल (पात्र) काय आहे, या गोष्टीला अधिक महत्त्व देतो. जर रोल मला आवडला तरच तो शो निवडतो, अन्यथा नाही. आणि नेहमी तोच तो पणा असण्यापेक्षा वेगळ्या प्रकारची भूमिका साकारण्यास अधिक प्राधान्य देतो. कॅरेक्टर मजेदार असेल तर काम करण्यात मजा येते. त्यानुसारच भूमिका निवडत असतो. 

* बॉलिवूड चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे का?- हो, नक्कीच. मी एक अ‍ॅक्टर आहे, आणि एक हिरो म्हणूनच जन्माला आलो आहे. आज प्रत्येक जण आपल्या आयुष्यात हिरो असतो. जो तो आपल्या पद्धतीने भूमिका साकारत असतो, त्यानुसारच माझा जन्मदेखील अभिनय करण्यासाठीच झाला आहे. चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्यास आवर्जून करेल. त्यातच मला प्रत्येक प्रकारची भूमिका साकारण्याची इच्छा आहे. 

* नवोदित कलाकारांना काय संदेश देशील?- प्रत्येकाची जीवन जगण्याची पद्धत वेगवेगळी असते. जो तो आपल्यापरीने योग्य जगत असतो. मात्र कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक असते. अभिनय क्षेत्र एक कला आहे, त्यामुळे या क्षेत्रात येण्याअगोदर ही कला समजून घेणे आवश्यक असते. शिवाय अ‍ॅप्रोचही योग्य असायला हवा. या क्षेत्रात हार्ड वर्कलाही खूपच महत्त्व आहे. त्यातच पॅशनिस्ट असणेही तेवढेच महत्त्वाचे. कारण पॅशन पैसा नाही तर संतुष्टी देते.  

टॅग्स :कुल्फी कुमार बाजेवालाविशाल आदित्य सिंह