अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) दीर्घकाळापासून विकी जैनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. हे नातं अंकितानं कधीच लपवलं नाही. पण लग्न कधी करणार? या प्रश्नावर मात्र तिनं कायम मौन बाळगलं. पण आता ‘पवित्र रिश्ता 2.0’चा ( Pavitra Rishta) तिचा को-स्टार शाहीर शेख (Shaheer Sheikh ) याने या प्रश्नाचं उत्तर दिलंच. अर्थात शाहिर आणखी काही बोलणार, त्याआधीच अंकितानं त्यालाही गप्प केलं.तर अंकिता व शाहिर दोघांनीही ‘पवित्र रिश्ता 2.0’ या मालिकेबद्दल एक मुलाखत दिली. या मुलाखतीत अंकिताला अनेक प्रश्न विचारण्यात आले. ‘पवित्र रिश्ता 2.0’नंतर तुझा काय प्लान आहे? असा प्रश्न तिला केला गेला. यावर मी काहीही नाही करणार, असं हसत हसत अंकिता म्हणाली. याचवेळी शाहीर शेखने तिची पोलखोल केली. ‘कम ऑन... तू लग्न करणार आहेस...,’ असं तो म्हणाला.
शाहिरच्या तोंडून हे वाक्य ऐकून अंकिता घाबरली. तिने लगेच त्याला गप्प बसायला सांगितलं. ‘शटअप शाहिर... तुम पागल हो? चुप रहो, चुप रहो... नहीं ऐसा कुछ भी नहीं है...,’ असं ती म्हणाली. अंकिता तिच्या लग्नाबद्दल खुलासा करू इच्छित नाही, ही गोष्ट एव्हाना शाहिरच्याही लक्षात आली होती. मग काय, त्यानंही वेळ सावरली.... अरे, खरंच मला अंकिताच्या लग्नाबद्दल काहीही कल्पना नाही..., असं तो म्हणाला. अंकिताही यावर सारवासारव करताना दिसली. या शोनंतर मी काहीही करत नाहीये. पण हो, फेबु्रवारीपासून काही नवं करेल, असं ती म्हणाली.
अंकिता व विकी जैन गेल्या तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांचा गुपचूप साखरपुडा झाल्याचंही कळतंय. यावर्षी बॉलिवूड बबलला दिलेल्या एका मुलाखतीत अंकिता लग्नाबद्दल बोलली होती. ‘प्रत्येक मुलीच्या असतात तशा लग्नाबद्दल माझ्याही भावना आहेत. कारण लग्न ही एक अतिशय सुंदर गोष्ट आहे. लग्न करण्यास मी उत्सुक आहे आणि मी लवकरच लग्न करतेय. पण अद्याप कुठलीही तयारी सुरू झालेली नाही,’ असं ती म्हणाली होती.विकी जैनआधी अंकिता सुशांत सिंग राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. ‘पवित्र रिश्ता’च्या सेटवरच दोघांची लव्हस्टोरी सुरू झाली होती. मात्र 2016 मध्ये दोघांचं बे्रकअप झालं होतं. जून 2020 मध्ये सुशांतचा मृत्यू झाला.