Join us

"स्वराज्य टिकवणे आणि वाढवणे याकडे लक्ष दे...", अश्विनी महांगडेची भावाच्या वाढदिवशी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 16:46 IST

Ashwini Mahangade : अश्विनी महांगडे हिने नुकतेच सोशल मीडियावर भावाच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashwini Mahangade) हिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. सध्या ती आई कुठे काय करते या मालिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेत तिने अनघाची भूमिका साकारली आहे. तिच्या या भूमिकेला चाहत्यांची पसंती मिळत आहे. दरम्यान आता अश्विनी महांगडे हिने नुकतेच सोशल मीडियावर भावाच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.

अश्विनी महांगडे हिने इंस्टाग्रामवर भावासोबतचा फोटो शेअर केला आहे आणि लिहिले की, बद्री....... वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप मोठा हो, मेहनत कर, तुला जे जे हवे ते सगळे तुला मिळो. मी कायम तुझ्या सोबत आहे. नानांना अभिमान वाटेल असेच काम कर. स्वराज्य टिकवणे आणि वाढवणे याकडे लक्ष दे.... बद्रिनाथ महांगडे. तिच्या या पोस्टवर चाहते भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. 

वर्कफ्रंट... अश्विनी महांगडे हिने 'अस्मिता' या मालिकेतील मनालीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले. या मालिकेशिवाय तिने बॉईज चित्रपटात साकारलेली शिक्षिकादेखील प्रेक्षकांना चांगलीच लक्षात राहिली. मात्र झी मराठी वाहिनीवरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील राणू अक्काच्या भूमिकेत अश्विनी दिसली होती. तिने टपाल, बॉईज, महाराष्ट्र शाहीर या चित्रपटात काम केले आहे. सध्या ती आई कुठे काय करते मालिकेत काम करताना पाहायला मिळते. तसेच ती धर्मरक्षक अहिल्याबाई होळकर या चित्रपटात झळकणार आहे.  

टॅग्स :अश्विनी महांगडेआई कुठे काय करते मालिका