Join us

Exclusive: 'लोक थेट येऊन कंबरेत हात टाकतात'; मराठी अभिनेत्रीला आला चाहत्यांचा विचित्र अनुभव

By शर्वरी जोशी | Updated: July 24, 2023 18:41 IST

Marathi actress: बऱ्याचदा चाहते आम्हाला गृहित धरतात आणि मग मर्यादा सोडून वागतात, असं ही अभिनेत्री म्हणाली.

मराठी कलाविश्वातील गुणी, शांत पण तितकीच लाघवी अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक (akshaya naik). 'सुंदरा मनामध्ये भरली' (sundara manamadhe bharli) या मालिकेमुळे आज ती लतिका याच नावाने विशेष लोकप्रिय आहे. पडद्यावर जितकी शांत, मनमिळाऊ दिसणारी अक्षया खऱ्या आयुष्यातही तशीच आहे. आजही ती चाहत्यांमध्ये गेल्यावर त्यांच्यातलाच एक भाग होऊन जाते. परंतु, तिच्या या साधेपणाचा बऱ्याचदा चाहते गैरफायदा घेतात. इतकंच नाही तर तिला गृहितही धरतात. याविषयी तिने अलिकडेच 'लोकमत ऑनलाइन'ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.

कलाकार होणं जितकं फायद्याचं आहे तितकाच त्याचा तोटादेखील आहे. कारण बऱ्याचदा चाहते आम्हाला गृहित धरतात आणि मग मर्यादा सोडून वागतात. आता आमच्या प्रोफेशनचा भाग असल्यामुळे चाहत्यांना तोडून बोलू शकत नाही. परंतु, काही वेळा आम्हालाही या गोष्टींचा त्रास होतो असं तिने सांगितलं.

Exclusive: मुसळधार पावसात अक्षयाची आजी झाली होती बेपत्ता; शोध घेतल्यावर समोर आलं थक्क करणारं सत्य

"लोक माझ्यावर प्रेम करतायेत याचं सगळं श्रेय माझ्या आईला जातं. कारण, आपण कुठून आलोय आहोत, आपण कोणी नसताना ज्या लोकांनी आपल्याला प्रोत्साहन दिलं त्या लोकांना आपण कधीच विसरायचं नाही हे आईने शिकवलं. त्यामुळे मी लोकांना भेटल्यावरही तितकंच आपुलकीने वागते आणि त्यामुळेच लोकांनाही मी त्यांच्या घरातली वाटते. ते खूप प्रेम करतात. पण, कधी कधी माझ्या याच स्वभावाचा मला त्रासही होतो, असं अक्षया म्हणाली.

Exclusive: सेलिब्रिटी ते डिलिव्हरी वूमन! अभिनेत्री असूनही अक्षया पोहोचवते लोकांच्या घरी जेवणाचे डबे

पुढे ती म्हणते, "काही वेळ लोक मला इतकं गृहित धरतात की मी रस्त्यात दिसल्यावरही कंबरेत हात घालून फोटो काढणार, हात ओढणार असे प्रकार घडतात. काही वेळा तर जबरदस्ती फोन नंबर मागणार किंवा मग माझ्या घरीच चल असा आग्रह करणार तर कधी कधी चाहत्यांशी फ्री वागणंदेखील तोट्याचं ठरतं." 

टॅग्स :अक्षया नाईकसेलिब्रिटीटेलिव्हिजन