Join us  

कोल्हापुरचा दर्शन साकारतोय ‘संत ज्ञानेश्वर’

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2016 9:07 AM

‘आवाज’ ही मालिका   संत ज्ञानेश्वर, महात्मा जोतिबा फुले आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित आहे. सुरुवातीला वीरेंद्र ...

‘आवाज’ ही मालिका   संत ज्ञानेश्वर, महात्मा जोतिबा फुले आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित आहे. सुरुवातीला वीरेंद्र प्रधान दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वर’ मालिका सुरू होईल. यामधील बाल ज्ञानेश्वर यांची भूमिका कोल्हापूरचा दर्शन माजगावकर साकारत आहे. दर्शन हा पत्रकार रणजित माजगावकर यांचा मुलगा आहे.संत ज्ञानेश्वर यांची भूमिका साकारणारा दर्शन सध्या आठवीमध्ये शिकत आहे. राज्य बालनाट्य स्पर्धेत  ‘झेप’ या बालनाट्यातील ‘मन्या’ या भूमिकेसाठी त्याला राज्य शासनाचे अभिनयाचे पारितोषिक मिळाले आहे. अहमदनगरला झालेल्या ‘कांकरिया करंडक’ स्पर्धेत उत्कृष्ट अभिनय, बेळगाव इथे झालेल्या ‘कॅपिटल वन’ या आंतरराज्यीय नाट्यस्पर्धेत पुरुष गटात प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. दर्शनने ‘कर्मवीरायण’ या चित्रपटासह ‘दोरखंड’या लघुपटातही भूमिका साकारली. अभिनयासह तो सध्या रायफल शुटिंग आणि स्केटिंगचे प्रशिक्षण घेतोय. दर्शनला लहानपासूनच नाण्यांचा संग्रह करण्याची आवड  आहे. अभिनयाच्या जोरावर दर्शन सध्या मालिकांमध्ये छाप पाडतोय.