Join us

‘या’ मालिकेने जिंकली टीआरपीची रेस, ‘देवमाणूस’ पडली मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2021 12:36 PM

पाहा कोणती मालिका आहे टॉपवर; मराठी मालिका हा मराठी चाहत्यांचा जिव्हाळ्याचा विषय. साहजिकचं मालिकांचा विषय येतो तेव्हा मागोमाग टीआरपीचा विषयही येतो.

ठळक मुद्दे ‘देवमाणूस’ ही मालिका लवकरच निरोप घेणार असल्याचे कळतेय. याचा थेट परिणाम या मालिकेच्या टीआरपीवर झाल्याचे दिसतेय.

मराठी मालिका हा मराठी चाहत्यांचा जिव्हाळ्याचा विषय. साहजिकचं मालिकांचा विषय येतो तेव्हा आपसूक टीआरपीचा विषयही मागोमाग येतो. लोकप्रियतेवरून मालिकांचा टीआरपी ठरतो. या टीआरपीच्या या स्पर्धेत टिकून राहणं इतकंही सोपं नाही. मग त्यासाठी मालिकेत नव नवे  ट्विस्ट आणि टर्न आणले जातात. अधिकाधिक लोकांनी मालिका पाहावी, यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवल्या जातात. या सगळ्यानंतर दर आठवड्याला टीआरपी ठरतो. गेल्या काही आठवड्यांपासून  ‘देवमाणूस’ ( Devmanus) ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये सर्वात पुढे होती. मात्र आता या मालिकेला पछाडत स्टार प्रवाह या वाहिनीवरच्या ‘फुलाला सुगंध मातीचा’ (Phulala Sugandh Maticha ) ही मालिका या रेसमध्ये अव्वल ठरली आहे.

 दुस-या क्रमांकावर ‘आई कुठे काय करते’ ही मालिका आहे. ‘मुलगी झाली हो’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत तिस-या क्रमांकावर असून ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका चौथ्या क्रमांकावर आहे. ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका पाचव्या क्रमांकावर आहे. सहाव्या क्रमांकावर ‘जय भवानी जय शिवाजी’ तर सातव्या क्रमांकावर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’चा महाएपिसोड आहे.   ‘देवमाणूस’ ही मालिका लवकरच निरोप घेणार असल्याचे कळतेय. याचा थेट परिणाम या मालिकेच्या टीआरपीवर झाल्याचे दिसतेय. ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये थेट आठव्या क्रमांकावर गेली आहे.

 

टॅग्स :स्टार प्रवाहझी मराठी