Join us

‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिका वादाच्या भोवऱ्यात, जाणून घ्या काय आहे भानगड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 15:22 IST

Phulala Sugandh Maticha : मालिकेतील काही दृश्यांवर आक्षेप घेत, एलजीबीटीक्यु कम्युनिटीने या मालिकेविरोधात एफआयआर दाखल केल्याचे कळतेय.

ठळक मुद्देया मालिकेत समृद्धी केळकर, हर्षद आतकरी, आदिती देशपांडे यांच्या मुख्य भूमिका आहेत.

छोट्या पडद्यावरची ‘फुलाला सुगंध मातीचा’ (Phulala Sugandh Maticha) ही मालिका सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मालिकेतील काही दृश्यांवर आक्षेप घेत,एलजीबीटीक्यु कम्युनिटीने या मालिकेविरोधात एफआयआर दाखल केल्याचे कळतेय. ‘येस वी एक्झिस्ट’ नावाच्या एका इन्स्टाग्राम पेजवरून याबाबतची पोस्ट शेअर करण्यात आली आहे. मालिकेविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याचे या पोस्टमध्ये म्हटलेय. तथापि अद्याप मालिकेच्या निर्मात्यांनी वा संबंधित चॅनलने यासंदर्भात कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. (Phulala Sugandh Maticha In Trouble)

‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत शुभद अर्थात हर्षद अतकरीने एका पाककला स्पर्धेत भाग घेतो.  या स्पर्धेत वेगवेगळे स्पर्धक सहभागी होतात. यातला एक स्पर्धक ‘सॅन्डी’ हा समलैंगिक आहे. ही भूमिका अभिनेता अजिंक्य पितळे याने साकारली होती. याच सॅन्डी व  जीजी आक्कावर चित्रीत दृश्यांवर आक्षेप नोंदवण्यात आला आहे.   जीजी आक्का सॅन्डीला त्याच्या राहणीमानावरून हिणवतात,  असे वागू नकोस असा सल्ला देतात. इतकेच नाही तर त्याला जिममध्ये जाऊन शरीर कमावण्याचाही सल्ला देतात, यावर  ‘येस वी एक्झिस्ट’ने आक्षेप घेत एफआयआर दाखल केला आहे.

असं आहे कथानकमुलीच्या जन्माप्रमाणेच तिचं शिक्षण हा देखील नेहमीच चर्चेचा विषय राहिलाय. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांचे वर्चस्व जरी पाहायला मिळत असले तरी लग्नानंतर तिनं घरी धुणी भांडी करावीत, घरसंसारात स्वत:ला झोकून द्यावे अशी अपेक्षा सासरच्या मंडळींकडून केली जाते. मात्र एकमेकांची स्वप्नं समजून घेणे आणि पूर्ण करायला साथ देणे म्हणजेच खरा संसार असतो. एकमेकांत मिसळून फुलण्यालाच संसार म्हणायचा असतो. ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेची गोष्ट अशाच स्वप्नांना पूर्ण करणा-या संसाराची आहे. या मालिकेत समृद्धी केळकर, हर्षद आतकरी, आदिती देशपांडे यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

टॅग्स :स्टार प्रवाहटेलिव्हिजन