'फुलाला सुगंध मातीचा' फेम समृद्धी केळकर लवकरच करणार छोट्या पडद्यावर कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 06:00 AM2023-01-24T06:00:00+5:302023-01-24T06:00:00+5:30

Samruddhi Kelkar : फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत किर्तीची भूमिका अभिनेत्री समृद्धी केळकरने निभावली होती. या

'Phulala Sugandha Maticha' fame Samriddhi Kelkar will soon make a comeback on the small screen | 'फुलाला सुगंध मातीचा' फेम समृद्धी केळकर लवकरच करणार छोट्या पडद्यावर कमबॅक

'फुलाला सुगंध मातीचा' फेम समृद्धी केळकर लवकरच करणार छोट्या पडद्यावर कमबॅक

googlenewsNext

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील फुलाला सुगंध मातीचा (Phulala Sugandh Maticha) या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेच्या कथानकात नेहमी विविध ट्विस्ट पाहायला मिळाले होते. या मालिकेत किर्तीची भूमिका अभिनेत्री समृद्धी केळकर(Samruddhi Kelkar)ने निभावली होती. या मालिकेतून ती घराघरात पोहचली आहे. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यामुळे अभिनेत्रीचे चाहते नाराज झाले होते. परंतु आता त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. समृद्धी लवकरच छोट्या पडद्यावर पुनरागमन आहे.

अभिनेत्री समृद्धी केळकर सोशल मीडियावर चर्चेत असते. फुलाला सुंगध मातीचा या मालिकेत ती सूनेच्या भूमिकेत झळकली होती. मात्र आता ती स्टार प्रवाहवरील कार्यक्रमात सुत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा या कार्यक्रमातून ती भेटीला येणार आहे. या कार्यक्रमात अभिनेता अंकुश चौधरी परिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा कार्यक्रम १८ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. सध्या या कार्यक्रमाचा प्रोमो व्हायरल होत आहे.

समृद्धी केळकर उत्तम अभिनेत्रीसोबत उत्तम नृत्यांगनादेखील आहे. तिने कथ्थकमध्ये अलंकारची पदवी घेतली आहे. तिने याआधी लक्ष्मी सदैव मंगलम या मालिकेत भूमिका साकारली आहे. तसेच तिने पुढचं पाऊल व लेक माझी लाडकी या मालिकांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. लावणीवर आधारित असलेल्या ढोलकीच्या तालावर या डान्स शोमध्येही ती सहभागी झाली होती.

Web Title: 'Phulala Sugandha Maticha' fame Samriddhi Kelkar will soon make a comeback on the small screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.