Join us

फुलपाखरूने गाठला यशस्वी ४०० भागांचा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 12:47 PM

फुलपाखरू या मालिकेने नुकताच ४०० भागांचा यशस्वी टप्पा पार गाठला आहे.  ४०० भागांचा माईलस्टोन पार केल्यानंतर सेलिब्रेशन तर जोरातच होणार आणि त्यांनी हा आनंद मालिकेच्या सेटवर केक कापून साजरा केला. यावेळी फुलपाखरू मालिकेची संपूर्ण टीम सेटवर उपस्थित होती. 

रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या झी युवा या वाहिनीने अगदी कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. लोकप्रियतेचा शिखर गाठलेल्या फुलपाखरू या मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली.  कॉलेजमधील निरागस प्रेम प्रेक्षकांसमोर आणणारी फुलपाखरू ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आणि त्यातील प्रमुख भूमिकेत असलेले मानस आणि वैदेही ही पात्र तर त्यांच्या मनात घर करून बसली आहेत.

या मालिकेने नुकताच ४०० भागांचा यशस्वी टप्पा पार गाठला आहे.  ४०० भागांचा माईलस्टोन पार केल्यानंतर सेलिब्रेशन तर जोरातच होणार आणि त्यांनी हा आनंद मालिकेच्या सेटवर केक कापून साजरा केला. यावेळी फुलपाखरू मालिकेची संपूर्ण टीम सेटवर उपस्थित होती. ही मालिका यशस्वीरित्या ४०० भाग पूर्ण करू शकली त्याबद्दल त्याने संपूर्ण टीमचे आभार मानले गेले. या आभार प्रदर्शनानंतर त्यांनी सेटवर केक कापून आनंद साजरा केला आणि या यशाच्यामागे असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तो भरवला. कार्यक्रमावर प्रेक्षकांचे निस्सीम प्रेम आहे आणि ते या कार्यक्रमाला पाठिंबा देत आहेत यात काही शंका नाही. कलाकारांनी सांगितले की, कार्यक्रमाविषयी आणि त्यातील लाडक्या पात्रांसाठी चाहत्यांकडून त्यांना नेहमीच सकारात्मक आणि चांगला प्रतिसाद मिळत आहे.  याविषयी बोलताना, हृता दुर्गुळे सांगते ४०० भागांचा यशस्वी टप्पा गाठणे हा आम्हा सर्वांसाठीच खूप आनंदाची गोष्ट आहे. फुलपाखरू या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आणि त्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो आणि म्हणूनच हा आनंद आम्ही फुलपाखरूच्या संपूर्ण टीमसोबत साजरा केला. या आनंदाच्या क्षणी मी रसिक प्रेक्षकांचे आभार मानू इच्छितो. ज्यांनी आमच्यावर इतकं प्रेम केलं आणि ती पुढेही आमची अशीच साथ देतील अशी आशा करते."

मालिकेला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे भारावून गेलेला, मानसची भूमिका करणारा यशोमन आपटे सांगतो, “हा टप्पा पार केल्यामुळे आम्हाला सर्वांना अतिशय आनंद झाला आहे. आमच्यावर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या आमच्या सर्व चाहत्यांचे आम्ही कृतज्ञ आहोत. हा एक सुंदर प्रवास होता आणि मला आशा आहे की, आम्ही असेच अनेक टप्पे पार करू.”

टॅग्स :फुलपाखरू