झी मराठी (Zee Marathi) वरील प्रत्येक मालिका उत्तम कथानक आणि कलाकारांचा अभिनय यांच्यामुळे लोकप्रिय होत असते. त्यामुळे आजवर या वाहिनीवरील प्रत्येक मालिका सुपरहिट ठरली आहे. यामध्येच सध्या 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका चर्चेत आहे. इंद्रा आणि दिपू यांच्या नात्यात येत असलेले चढउतार दिवसेंदिवस प्रेक्षकांची उत्कंठा वाढवत होते. परंतु, आता या मालिकेत आनंदाचे दिवस येणार असल्याचं पाहायला मिळत आहे.
इंद्रा आणि दिपू यांच्या नात्याला देशपांडे सरांनी कडाडून विरोध केला होता. काही झालं तरी गुंडप्रवृत्तीच्या इंद्रासोबत दिपूचं लग्न लावून देणार नाही असा अट्टाहास देशपांडे सरांचा होता. मात्र, इंद्राचं सत्य समजल्यानंतर देशपांडे सरांना त्यांची चूक उमगते आणि ते या दोघांच्या लग्नाला परवानगी देतात.
सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये देशपांडे सर इंद्रा आणि दिपूच्या नात्याचा स्वीकार करताना दिसतात. विशेष म्हणजे त्यांचा हा निर्णय कार्तिक आणि सानिका सोडून साऱ्यांना आवडतो. त्यामुळे सध्या या मालिकेत पुन्हा एक नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, मन उडू उडू झालं ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ऑगस्ट महिन्यात ही मालिका संपणार असल्याचं सांगण्यात येत. त्यामुळे इंद्रा आणि दिपू म्हणजेच हृता आणि अजिंक्य येत्या १३ ऑगस्टला अखेरचे प्रेक्षकांच्या भेटीला येतील असं म्हटलं जात आहे.