प्राजक्ता माळी फुलवंती सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमातील 'मदनमंजिरी' हे गाणंही प्रचंड व्हायरल झालं होतं. या गाण्यात प्राजक्ताने मनमोहक डान्स करून चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. 'मदनमंजिरी' गाण्यावरील अनेक रील्सही व्हायरल झाले होते. आता प्राजक्ताने नुकत्याच झालेल्या झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यातही 'मदनमंजिरी'वर तिच्या अदा दाखवल्या. यावेळी तिला अभिनेत्री मृण्मयी देशपांडेनेदेखील साथ दिली.
नुकतंच झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात प्राजक्ता माळी आणि मृण्मयी देशपांडेच्या नृत्याची मैफील सजल्याचं पाहायला मिळालं. फुलवंतीमधील 'मदनमंजिरी' गाण्यावर प्राजक्ता आणि मृण्मयीने डान्स करत उपस्थितांची मनं जिंकून घेतली. याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत प्राजक्ता आणि मृण्मयीची जुगलबंदी पाहायला मिळत आहे. 'मदनमंजिरी' गाण्याच्या हुकस्टेप त्या दोघी करताना दिसत आहेत.
दरम्यान, झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा लवकरच टीव्हीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्याचं यंदाचं हे २५वं वर्ष आहे. या सोहळ्यात वर्षभरातील मराठी सिनेमांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं आहे.